पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल अटकेत

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आपल्याच विभागात काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलला अटक केली आहे. पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या करणारा कॉन्स्टेबल शिवशंकर तिवारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहेत. तिवारी हा motor vehicle cell मध्ये कार्यरत होता. अँटॉप हिल ACP सोबत तो ड्युटीवर असायचा.

ADVERTISEMENT

आपल्या पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध सुरु असल्याचं कळताच तिवारीने प्रियकराची हत्या करुन त्याचं शिर कापत बॉडीची विल्हेवाट लावली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचं नाव दादा जगदाळे असं असून तो सोलापूरचा रहिवासी होता. २९ सप्टेंबरला पोलिसांना अँटॉप हिल कार्यालयाजवळ एक शिर कापलेला मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडला होता. आरोपीने मृतदेहाचे हात-पायही कापले होते त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं कठीण जात होतं.

हे वाचलं का?

यानंतर चौकशीदरम्यान पोलिसांना मृतदेहाच्या हातावर ‘दादा’ असा टॅटू सापडला. यावरुन पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता त्यांना या प्रकरणाचे धागेदोरे थेट सोलापूरपर्यंत मिळाले. यानंतर अधिक चौकशी केली असतान मुंबई पोलिसांनी दादा जगदाळेचा सोलापूरचा पत्ता शोधून काढत त्याच्या नातेवाईकांकडून तो हरवला असल्याची खात्री करुन घेतली.

दादा जगदाळेचे कॉल रेकॉर्ड चेक करत असताना पोलिसांना त्याने अनेकदा कॉन्स्टेबल तिवारी आणि त्याची पत्नी मोनालीला फोन केल्याचं दिसून आलं. ज्या दिवशी मृतदेह सापडला त्या दिवशी तिवारीची खासगी गाडी त्या परिसरात सीसीटीव्ही मध्ये पहायला मिळाली. यानंतर पोलिसांनी चौकशीची दिशा बदलून तिवारीला ताब्यात घेतलं असता त्यानेच दादा जगदाळेची हत्या केल्याचं निष्पन्न झालं.

ADVERTISEMENT

तिवारीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला असून आपली पत्नी आणि दादा जगदाळे हे एकाच गावचे असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर ती आपल्या गावी निघून गेली होती. इथेच तिची दादा जगदाळेसोबत ओळख झाली. काही दिवसांनी पत्नी मुंबईला परत आल्यानंतर तिवारी आपल्या पत्नीच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजलं. यानंतर तिवारीने जगदाळेला संपवलं, ज्यात त्याची पत्नी मोनालीनेही त्याला मदत केली. पोलिसांनी तिवारी व त्याची पत्नी मोनालीला कोर्टासमोर हजर केलं असून त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT