Crime : Google वर कस्टमर केअरचा नंबर शोधला, फोन केला अन् लाखो रुपये…

मुंबई तक

Crime | Online Fraud : दिल्ली : नोएडामध्ये ऑनलाइन फसवणुकीचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. यात संबंधित व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ८ लाख २५ हजार साफ करण्यात आले आहेत. गुगलवर केवळ डिशवॉशर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करण्याची आणि तो डायल करण्याची चूक संबंधित व्यक्तीला महागात पडली आहे. अमरजित सिंग आणि त्यांच्या पत्नीसोबत हा प्रकार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Crime | Online Fraud :

दिल्ली : नोएडामध्ये ऑनलाइन फसवणुकीचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. यात संबंधित व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ८ लाख २५ हजार साफ करण्यात आले आहेत. गुगलवर केवळ डिशवॉशर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करण्याची आणि तो डायल करण्याची चूक संबंधित व्यक्तीला महागात पडली आहे. अमरजित सिंग आणि त्यांच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला आहे. (online fraud with noida senior citizen fake customer care)

नेमकं काय घडलं?

आज तकच्या बातमीनुसार, पीडित कुटुंबीय नोएडामधील सेक्टर 133 मध्ये राहतात. शनिवारी (२५ फेब्रुवारी) अमरजीत यांच्या पत्नीने गुगलवर डिशवॉशर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला, यावेळी त्यांना ‘1800258821’ हा नंबर मिळाला. त्यावर त्यांनी फोनही केला. हा नंबर गुगलवर आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने होता.

दुसऱ्या बाजूने एका महिलेने फोन उचलला. त्या महिलेने आपल्या वरिष्ठांशी बोलायला लावले. यानंतर, कथित वरिष्ठाने अमरजीत यांच्या पत्नीला फोनवर Any Desk नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. त्यांनी हे अॅप डाउनलोडही केलं. याच्या मदतीने समोरील कोणत्याही व्यक्तीच्या फोन किंवा सिस्टम ऍक्सेस आपल्याला वापरता येऊ शकतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp