मुंबईतील हॉटेलात खासदाराचा मृतदेह सापडला, आत्महत्या केल्याचा अंदाज
मुंबई: दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील सी ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ज्या हॉटेलच्या रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे तिथेच एक सुसाइड नोट देखील मिळाली असल्याची माहिती समजते आहे. ही सुसाइड नोट गुजरातीत असल्याचंही समजतं आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबई: दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील सी ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच हाती आलं आहे. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. ज्या हॉटेलच्या रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे तिथेच एक सुसाइड नोट देखील मिळाली असल्याची माहिती समजते आहे. ही सुसाइड नोट गुजरातीत असल्याचंही समजतं आहे.
दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. पण खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण हे पोस्टमार्टमनंतरच समजू शकणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन देलकर हे आपल्या एका कामानिमित्त मुंबईत आले होते. पण आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीन व्ह्यूमध्ये आढळून आल्याचं वृत्त समोर आलं.
ही बातमी पाहा: अभिनेता संदिप नाहरची आत्महत्या, फेसबूकवर पोस्ट केली सुसाईड नोट
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कोण आहेत मोहन देलकर
58 वर्षांचे मोहन देलकर हे दादरा आणि नगर हवेलीच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते अपक्ष म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. 1989 साली ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून ते अनेकदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
ADVERTISEMENT
मोहन देलकर यांनी भारतीय नवशक्ती पार्टीच्या तिकीटावर देखील खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, 2009 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि निवडून देखील होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT