MNS Pune Sabha: राज ठाकरेंचं ठरलं.. पुण्यात सभा होणारच, पण केला मोठा बदल!
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. पण पुण्यातील या सभेत मनसेने एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंची ही सभा मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. याबाबत मनसेने आता अधिकृत घोषणा केली. राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्रात सभा घेणार होते. त्यासाठी तयारीही झाली […]
ADVERTISEMENT

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. पण पुण्यातील या सभेत मनसेने एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंची ही सभा मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. याबाबत मनसेने आता अधिकृत घोषणा केली.
राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्रात सभा घेणार होते. त्यासाठी तयारीही झाली होती. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच ही तारीख ठरली होती. मात्र, आता यामध्ये एक बदल झाला आहे.
असं असताना काल अशी बातमी समोर आली आहे की राज ठाकरे यांची सभा रद्द झाली. मात्र आता राज ठाकरेंची सभेची तारीख, ठिकाण आणि वेळ सारं काही ठरलं असून त्याची अधिकृत माहितीच मनसेकडून देण्यात आली आहे.
राज ठाकरेंची पुण्यातील सभा कधी होणार?