Sputnik-V: सीरम आता भारतात बनवणार रशियन बनावटीची स्पुटनिक-V लस, DCGI ची मंजुरी
नवी दिल्ली: कोरोना (Corona) साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशात लस उत्पादन काम सध्या जोरदार सुरू आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII)ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे भारतात रशियन बनावटीच्या स्पुटनिक-V(Sputnik-V)लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली होती. याबाबत डीसीजीआयने आज (4 जून) स्पुटनिक-V च्या उत्पादनाला परवानगी दिली आहे. डीसीजीआयची मान्यता मिळाल्यानंतर सीरम भारतात स्पुटनिक-V या लसीचं उत्पादन […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: कोरोना (Corona) साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशात लस उत्पादन काम सध्या जोरदार सुरू आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII)ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे भारतात रशियन बनावटीच्या स्पुटनिक-V(Sputnik-V)लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली होती. याबाबत डीसीजीआयने आज (4 जून) स्पुटनिक-V च्या उत्पादनाला परवानगी दिली आहे.
डीसीजीआयची मान्यता मिळाल्यानंतर सीरम भारतात स्पुटनिक-V या लसीचं उत्पादन करू शकणार आहे. डीसीजीआयने स्पुटनिक-V च्या परीक्षा, चाचणी आणि विश्लेषणासह त्याच्या उत्पादनासाठी सीरमला परवानगी दिली आहे.
सीरम हे आधीपासून आधीच कोव्हिशिल्ड (Covishield) या कोव्हिड प्रतिबंधक लसीची निर्मिती करीत आहे. परंतु आता ही कंपनी रशियन बनावटीची स्पुटनिक-V नावाची रशियन लस देखील तयार करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वीच या लसीच्या परीक्षण, चाचणी आणि विश्लेषणासाठी डीसीजीआयकडे अर्ज केला होता.
Covaxin की Covishield; कोणती Vaccine जास्त प्रभावी ?










