बेळगाव, निपाणी, कारवार हा आमचाच भाग : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचं उत्तर
मुंबई : बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी […]
ADVERTISEMENT

मुंबई : बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा भाग आम्हाला निश्चित परत मिळेल. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा आमचा भाग आहे. ही आमची भूमिका आहे. आमची ही भूमिका आम्ही २००४ सालापासून न्यायालयात मांडली आहे. तसंच ही कायद्याच्या चौकटीत आम्ही मागणी केली आहे. यात कुठेही चिथावणीखोर वक्तव्य नाही.
केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकमध्येही भाजपचं सरकार असल्यानं आता या मागण्या केल्या जात आहेत, या आरोपांवर फडणवीस म्हणाले, या पूर्वी सर्वात जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात देखील काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होतं. परंतु, त्यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही. मात्र आता सीमा प्रश्नावरून कोणीही राजकारण करू नये, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
काय म्हणाले होते बसवराज बोम्मई :
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.