मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस धावणार! देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी
नवी दिल्ली : आशियातील सर्वांत मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा मिळाली असून या पुनर्विकास प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज दिल्ली दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात या प्रकल्पाच्या ‘डेफिनेटिव्ह […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : आशियातील सर्वांत मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा मिळाली असून या पुनर्विकास प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज दिल्ली दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधीकरण यांच्यात या प्रकल्पाच्या ‘डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते.
समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे :
यावेळी बोलताना फडणवीस यांनी इतरही काही प्रकल्पांची भेट राज्याला मिळाली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वे :
खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार या प्रकल्पाबाबतही चर्चा झाली असून लवकरच याबाबत सकारात्मक विचार करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी 487 कोटी
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी कार्यादेश मिळाला असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे. या कार्यादेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी आज दिली.









