Swati Maliwal: ‘वडिलांनीच माझं लैंगिक शोषण केलं, ते घरी आले की…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Swati Maliwal Sexually Assaulted : जेव्हा मी लहान होते त्यावेळेस माझ्या वडिलांनीच माझे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी केला आहे. या शोषणानंतर मी रोज रात्री विचार करायचे, महिलांना कशाप्रकारे हक्क मिळवून दिला पाहिजे. मुलींचे आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, असे स्वाती मालीवाल यांनी सांगितले आहे. त्यांच्या या विधानानंतर एकच खळबळ माजली आहे. (dcw chief swati maliwal expresses her father sexually assaulted during childhood)

ADVERTISEMENT

मला अजूनही आठवणीत आहे. जेव्हा ते मला मारायला यायचे, त्यावेळी ते माझी शेंडी पकडायेच आणि माझं डोक भिंतीवर आपटायचे.ज्यामुळे मला गंभीर इजा व्हायची आणि माझ्या डोक्यातून रक्त वाहायचे, असा देखील वाईट अनुभवाचा किस्सा मालिवाल यांनी सांगितला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती खुप अत्याचार सहन करतो,त्यावेळेसच तो दुसऱ्याचे दु:ख समजू शकतो. तेव्हा त्याच्या आतमध्ये असा ज्वालामुखी पेटतो, ज्यामुळे तो संपुर्ण यंत्रणा हादरवून टाकू शकतो. माझ्यासोबत देखील तेच घडले आहे, असे मालीवाल (Swati Maliwal) सांगतात.

प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?

हे वाचलं का?

जेव्हा मी लहान होते, त्यावेळेस माझे वडिल लैंगिक शोषण करायचे. ते मला खुप मारायचे. ज्यामुळे घाबरून मी बिछाण्याच्या खाली लपायचे आणि रोज रात्री विचार करायचे, महिलांना कशाप्रकारे हक्क मिळवून दिला पाहिजे. मुलींचे आणि महिलांचे शोषण करणाऱ्यांना कसा धडा शिकवला पाहिजे, असे स्वाती मालीवाल म्हणाल्या आहेत. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा त्या चौथीत शिकत होत्या. तेव्हा त्या वडिलांसोबत राहायच्या आणि अनेकदा ही घटना घडली होती.

चिकन न बनवल्याने भडकला, पत्नीचं डोकं फोडतं हातही तोडला

ADVERTISEMENT

दरम्यान स्वाती मालीवाल (Swati Maliwal) दिल्ली महिला आयोगाच्या (DCW)अध्यक्षा आहेत. 2021 मध्ये स्वाती मालीवाल यांना सलग DCW ची जिम्मेदारी सोपवण्यात आली होती. नुकत्याच त्या एका विधानामुळे चर्चेत आल्या होत्या. जेव्हा त्यांनी दिल्लीतील रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतल्याचा दावा केला होता.

ADVERTISEMENT

डोक्यात घातला हातोडा, पत्नीने जागेवरच जीव सोडला; नागपूरमध्ये खळबळ

स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर रात्री उशीरापर्यंत महिलांच्या सुरक्षेची तपासणी केली होती.त्यावेळेस एका गाडी वाल्याने दारूच्या नशेत त्यांच्याशी छेडछाड केली होती. जेव्हा त्यांनी त्याला पकडले होते, त्यावेळेस त्याने गाडीच्या काचा हातासोबत बंद करत त्यांना फरफटत नेले होते.देवामुळे त्यांचे प्राण वाचले. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नाहीयेत, त्यामुळे परिस्थितीचा विचार करा, अशा आशयाचे ट्विट स्वाती मालीवाल यांनी केले होते. दरम्यान स्वाती मालीवाल यांना दारूच्या नशेत कार चालकाने 10 ते 15 मीटरपर्यंत फरफटत नेले होते. दिल्लीच्या एम्स परिसरात ही घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला पकडण्यात आले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT