संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. ते होम क्वारंटाईन झाले आहेत.

ADVERTISEMENT

काय आहे राजनाथ सिंह यांचं ट्विट?

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने विलिगीकरण करावे आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी. मला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत.’

हे वाचलं का?

देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. या महिन्याच्या अखेरीस कोरोना रूग्णांची संख्या उच्चांकी असेल असंही मत नोंदवलं गेलं आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की या काळात देशात रोज चार ते आठ लाख रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या जाऊ शकते.

कठोर निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर आटोक्यात येईल. पण कोरोनाची ही लाट दीर्घकाळ राहणार आहे असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनसारख्या निर्बंधांशिवाय कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही असंही म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

देशात मागील चोवीस तासात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 रूग्ण आढळले आहेत. यातले सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रविवारी 44 हजार 388 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये 24 हजार 287 रूग्ण, दिल्लीत 22 हजार 751 रूग्ण, तामिळनाडूत 12 हजार 895 रूग्ण तर कर्नाटकमध्ये 12 हजार नवे रूग्ण आढळले आहेत.

ADVERTISEMENT

देशात ओमिक्रॉनने बाधित झालेल्या रूग्णांची संख्याही 4 हजार 33 झाली आहे. यातले सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहेत. महाराष्ट्रातल्या रूग्णांची संख्या 1216 तर राजस्थानमधली संख्या 529 झाली आहे. 4033 रूग्णांपैकी 1533 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे राजकारणी आणि सेलिब्रिटींनाही कोरोना होतो आहे. राजनाथ सिंह यांना कोरोना झाला आहे त्यांनी स्वतः ट्विट करून आपण होम क्वारंटाईन झाल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT