‘मोदीजी काय नौटंकी सुरु आहे? बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ?’ लुकआऊट नोटीसनंतर मनीष सिसोदिया भडकले
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मद्य उत्पादन धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात लुकआऊट जारी केलं आहे. त्याचबरोबर यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सीबीआयने ईडीला सोपवले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यावरून मनिष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ?’- सिसोदिया सीबीआयचे लुकआउट परिपत्रक जारी […]
ADVERTISEMENT

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मद्य उत्पादन धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात लुकआऊट जारी केलं आहे. त्याचबरोबर यासंबंधीचे सर्व कागदपत्रे सीबीआयने ईडीला सोपवले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यावरून मनिष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ?’- सिसोदिया
सीबीआयचे लुकआउट परिपत्रक जारी झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, काय नौटंकी आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ? त्याचबरोबर सिसोदिया यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींचे एक विधानही शेअर केले आहे, ज्यामध्ये ते सीबीआयच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
ट्विट करत मोदींवर साधला निशाणा