उपमुख्यमंत्री Ajit Pawar थेट शिवसेनेच्या शाखेत, एवढा बदल झाला तरी कसा?
पंढरपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या आपल्या पक्ष वाढीसाठी खूपच झटत असल्याचं दिसतं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) अस्तित्वात असल्याने त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) कसा होईल यासाठी अजित पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. खरं तर कधीकाळी भाजपच्या (BJP) गोटात जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे […]
ADVERTISEMENT

पंढरपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या आपल्या पक्ष वाढीसाठी खूपच झटत असल्याचं दिसतं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) अस्तित्वात असल्याने त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) कसा होईल यासाठी अजित पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. खरं तर कधीकाळी भाजपच्या (BJP) गोटात जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे काल (16 एप्रिल) चक्क शिवसेनेच्या एका शाखेत (Shiv Sena Shakha) गेले. येथील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात काल शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर अजित पवार हे थेट मंगळवेढ्यातील शिवसेना शाखेत गेले. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. खरं तर ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. त्यामुळे थेट शिवसेना शाखेत जाऊन अजित पवारांनी शिवसेनेच्या मतदारांपर्यंत योग्य तो मेसेज या निमित्ताने पोहचवला आहे. मात्र, अजित पवारांमध्ये एवढा मोठा बदल नेमका झाला तरी कसा हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Ajit Pawar Pandharpur: ‘सरकार बदलणारा जन्माला यायचा आहे, आपला नाद करायचा नाय…’, अजितदादांचा फडणवीसांना इशारा
23 नोव्हेंबर 2019… अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा भल्या सकाळचा शपथविधी…