शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असं का म्हणाले?
शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची जरी प्रतिक्रिया आली नसली तरी उपमुख्यमंत्र्यांनी या युतीवर बोलताना टोला लगावला […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना शुक्रवारी घडली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा करण्यात आली होती. यावर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची जरी प्रतिक्रिया आली नसली तरी उपमुख्यमंत्र्यांनी या युतीवर बोलताना टोला लगावला आहे.
‘विनाश काले विपरीत बुद्धी’ : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर माध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान जेव्हा पत्रकारांनी त्यांना शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर त्यांनी फक्त ‘विनाश काले विपरीत बुद्धी’, अशी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला. आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीचा काय फायदा होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र या युतीमुळे शिंदे गट आणि भाजपला काय नुकसान होणार, हेही पाहणं गरजेचं असणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही युतीवरून केली होती टीका










