पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात मुक्ताई नगरमधून केली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजनही होते. खडसे यांच्या घरी त्यांची सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे या होत्या. त्यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी […]
ADVERTISEMENT
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात मुक्ताई नगरमधून केली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री गिरीश महाजनही होते. खडसे यांच्या घरी त्यांची सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे या होत्या. त्यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. एकनाथ खडसेंच्या घरी देवेंद्र फडणवीस आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.
Tauktae चक्रीवादळ, मोदींनी महाराष्ट्राला मदत जाहीर न करणे हा अन्यायच-खडसे
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
खडसे-फडणवीस यांच्यात आहे राजकीय हाडवैर
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला भाजप पक्ष सोडचिठ्ठी द्यावी लागली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आरोपाचे खंडन केले होते.
ADVERTISEMENT
मात्र, नंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान शरद पवार यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत कालच भेट घेतली. त्या पाठोपाठ आज एकनाथ खडसेंच्या घरी देवेंद्र फडणवीस गेल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नाथाभाऊ आणि फडणवीस यांची भेट झाली नाही. मात्र ज्या खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून भाजप सोडलं आणि राष्ट्रवादीत गेले, त्याच खडसेंच्या घरी आज देवेंद्र फडणवीस गेले होते त्यामुळे हे कुठेतरी डॅमेज कंट्रोल करू पाहात आहेत का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
भाजप खासदार रक्षा खडसे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज
खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेल्या भेटीने उंचावल्या नजरा-
दोन्ही नेत्यांमध्ये हाडवैर असताना फडणवीस यांनी खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेली सदिच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राजकीय गणिते ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत. ‘मिशन लोटस’चा हा एक भाग असल्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विस्तव जात नाही. अशात आता खडसेंच्या घरी जाऊन त्यांनी नेमकं काय साध्य केलं? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत.
ADVERTISEMENT