या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा बॉम्बस्फोट झाले; फडणवीसांचं खळबळजनक विधान
–योगेश पांडे, नागपूर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. ईडीने तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस काय […]
ADVERTISEMENT
–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. ईडीने तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सविस्तर भूमिका मांडली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
हे वाचलं का?
“एनआयएने मध्यंतरी कारवाया केल्या. या झाडाझडतीमध्ये एनआयएला माहिती मिळाली की, दाऊद ईब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिग करतोय. रिअल इस्टेटचे व्यवहार मनी लाँडरिंगच्या माध्यमातून होत आहे. यासंदर्भात नऊ ठिकाणी ईडीने सर्च केलं. त्यातून अनेक लिंक्स बाहेर आलेल्या आहेत. यातीलच एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे.”
“नवाब मलिक यांनी जी जमीन घेतली आहे, ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा उजवा हात आहे. ज्याला हसीना पारकर दाऊदच्या मालमत्ता व्यवहारात दाऊदचा फ्रंटमॅन म्हणून वापरायची. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली. जमिनीचे जे मालक आहेत, त्यांनी सांगितलं की एकही पैसा मिळालेला नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. अतिक्रमण काढण्यासाठी पावर ऑफ अॅटर्नी मागण्यात आली आणि ती बदलवून हा व्यवहार करण्यात आला.”
ADVERTISEMENT
“जे २५ लाख रुपये दिल्याचं दाखवलं जात आहे, ते पैसे त्यांना मिळाले नाहीत. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी यासंदर्भातले सौदे झाले. तिथे हसीना पारकर येत होती आणि सौदा करत होती. तिथल्या लोकांनी यासंदर्भातील जबाब दिलेला आहे. हा जो व्यवहार झाला आणि ५५ लाख रुपये हसीना पारकर यांना दिल्याचे पुरावे ईडीला मिळाले असून, त्याची माहिती त्यांनी दिली आहे. या व्यवहारामध्ये ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाले. ते पैसे अंडरवर्ल्डकडे कसे गेले. यात मनी लाँडरिंगचा अँगल आहे.”
ADVERTISEMENT
“जमीन घेऊन जे पैसे दिले गेले ते हसीना पारकरला म्हणजेच दाऊदला गेले. मंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेण्याचं कारण काय? जमीन त्यांची नसताना विकत घेण्याचं कारण काय? हसीना पारकरशी व्यवहार करण्याचं कारण काय? हा व्यवहार झाल्यानंतर तीन वेळा मुंबईत बॉम्बस्फोट आणि हल्ले झालेत. जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात अशांना आपल्या व्यवहारातून पैसे देणार असू, तर हे निंदनीय आहे. ईडीने म्हणून ही कारवाई केलीये. ईडीने सत्य मांडलं आहे.”
“बॉम्बस्फोटात जे तुरुंगात आरोपी आहे, त्यांचा जबाब ईडीकडून घेतला गेला आहे. ज्यांच्यासमोर व्यवहार झाला, त्यांचाही जबाब घेतला गेला आहे. जे मूळ मालक आहेत, त्यांनी तर स्पष्टच सांगितलं आहे की, आम्हाला एक पैसाही मिळालेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, ही कारवाई नियमानुसार केलेली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अपराध्यांशी आणि दाऊदच्या बहिणीशी व्यवहार करणं, याचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं?. ईडीने पुरावे कोर्टासमोर मांडले आहे आणि न्यायालयाने त्यांना कोठडी दिली आहे.”
“टेरर फंडिंग होत असेल, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी संगनमत करून जमिनी घेतल्या जात असतील, तर कोणतंही राजकारण न करता सगळ्यांनी याचा निषेध केला पाहिजे. याच्यावर राजकारण न करता देशाचा शत्रू असलेल्या दाऊदच्या विरोधात सर्वांनी एकत्रितपणे भूमिका मांडली पाहिजे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT