फडणवीसांनी ठाकरे सरकारला सळो की पळो करुन सोडलं, एकापाठोपाठ एक जबरदस्त हल्ले
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना मुंबई महापालिकेत कोव्हिड काळात झालेले घोटाळे ते नालेसफाईमधील घोटाळा यासारख्या अनेक विषयावरुन ठाकरे सरकारला सळो की पळो करुन सोडलं. या वेळी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या एकूणच कारभारावर एकापाठोपाठ एक असे जबरदस्त असे हल्ले चढवले. फडणवीसांचे हे सगळेच आरोप प्रचंड गंभीर […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना मुंबई महापालिकेत कोव्हिड काळात झालेले घोटाळे ते नालेसफाईमधील घोटाळा यासारख्या अनेक विषयावरुन ठाकरे सरकारला सळो की पळो करुन सोडलं. या वेळी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या एकूणच कारभारावर एकापाठोपाठ एक असे जबरदस्त असे हल्ले चढवले. फडणवीसांचे हे सगळेच आरोप प्रचंड गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे राज्य सरकार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांनी नेमका कसा चढवला ठाकरे सरकारवर हल्ला?
-
मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा आर्थिक संसाधन व्यवस्थापनच्या बाबतीत आकडा 45 वर आहे.
हे वाचलं का?
मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, कामगारांना घर द्यायचं आहे पण इथे लुटीचं काम सुरु आहे.
कोरोनाच्या काळात तर मोठे घोटाळे झाले. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा, उपकरण खरेदीत, संचालन कंत्राट, मनुष्यबळ पुरवठा, फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड खरेदी यासारख्या असंख्य गोष्टीत घोटाळे झाले. यासह प्रचंड घोटाळे झाल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एक भली मोठी यादीच फडणवीसांनी सभागृहात वाचली आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
ADVERTISEMENT
-
मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरु आहे. यावर आम्ही बोललो तर आम्हाला मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे शत्रू ठरवलं जातं. म्हणजे मुंबईला लुटून खाणारे हितचिंतक दैवत पण विरोधात बोलणारे शत्रू का? पण आता प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे की कोण आपला शत्रू आहे? कोण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खातं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील 5 जम्बो कोव्हिड सेंटरचे 100 कोटीचं कंत्राट हे काही पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिले गेले. नामांकित कंपन्यांची नावाशी साधर्म्य असलेली नावं त्यांच्या कंपन्यांना दिली आणि त्याच आधारे कंत्राट मिळवलं. दादा तुम्ही पुण्यातून 15 दिवसात ज्या कंपनीला हाकललं होतं आणि ज्यांचं कोव्हिड सेंटरचं कंत्राट काढून घेतलं होतं त्यांनाच मुंबईत 5 कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिलं गेलं. पण कारवाई झाली नाही.
‘तेच मूर्ख, तेच शहाणे…’, फडणवीसांनी सभागृहात सादर केली कविता अन्..
-
सप्टेंबर 2020 अशी परिस्थिती होती की वजन पडल्याशिवाय फाईल हालत नव्हत्या. पण लोकांच्या आरोग्यापेक्षा मुंबई महापालिकेला सर्वात जास्त रस कशात तर पेन्ग्विनमध्ये. मुंबईची रंगरंगोटी, काचा काय नवे बस स्टॉप काय.. दर तीन महिन्याला हे सुरु.. ही चांगली गोष्ट आहे. मात्र मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गरीब माणसाला उपचारासाठी आपण काहीच देत नसाल तर या गोष्टींचा काय उपयोग आहे?
-
मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुरुवातीला 130 कोटींची संपत्ती सापडली होती. आता हीच संपत्ती 300 कोटीपर्यंत गेली आहे. मागील 24 महिन्यात 38 मालमत्तांची खरेदी केली आहे. एकीकडे लोक कोरोनाने मरत होते. पण यांनी 24 महिन्यात 38 संपत्ती खरेदी केल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT