Sanjay Raut: “देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होणं हाच खरा राजकीय भूकंप”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हाच खरा राजकीय भूकंप आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण ते असे अर्धवट येतील हे कुणाला वाटलं नव्हतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरात ही टीका केली आहे.

बंडखोर आमदारांच्या मुंबईतल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी काय म्हटलंय?

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातलं एक पर्व संपलं. जेमतेम अडीच वर्षांचाच कालखंड पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. पाच वर्षांसाठी स्थापन झालेले महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षात कोसळलं. मात्र ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळेच नाही. माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला. याच गटाने भाजपचा विधानपरिषदेचा पाचवा उमेदवार निवडून आणला. दगाबाजीची ही बीजं रोवली जात असतानाच मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी या लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवला होता.

मलादेखील गुवाहाटीची ऑफर होती, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असा भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच झाला नव्हता हे एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत बोललं गेलं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता. मात्र सत्य वेगळंच होतं. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवलं आणि महाराष्ट्रातील भाजप पूर्णपणे अंधारात होता.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतल्या नेत्यांनी रोखली आणि शिंदे यांना बळ दिलं. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे.

महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होते, मात्र फडणवीस यांच्यात अमित शाह यांच्यात सख्य नव्हतं. मला उपमुख्यमंत्रीपद नको, चंद्रकांत पाटील यांना ते द्या मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा ही विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी त्यांचेच ज्युनिअर असलेल्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचं फळ आहे. २०१९ मध्ये सत्तेचा ५०-५० टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकराला नाही त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाले. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. काळाने फडणवीसांवर घेतलेला सूड आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT