Devendra Fadnavis यांना हात जोडून विनंती की… : सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Supriya Sule reaction on Devendra Fadnavis Statement :

परभणी : “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी राजकारण बाजूला सोडून थोडसं खरं बोलायला शिकावं आणि राज्याच्या मायबाप जनतेची सेवा करावी”, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं. त्या परभणीमध्ये बोलत होत्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी पार पडला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजकारणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis Statement on November 2019 oath ceremony with Ajit Pawar)

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. मात्र मला ‘देवेंद्र फडवणीससे ये उम्मीद नाही थी’. देवेंद्र फडवणीस बोलत असलेला तो व्हिडिओ मी एका चॅनेलवर पाहिला. त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडवणीस हे “मी कॅमेरा नाही म्हणून बोलत आहे” असे म्हणताना ऐकायला मिळत. अशी काय गोष्ट आहे जी ऑन कॅमेरा बोलायची नाही? त्यांनी ही गोष्ट ऑन कॅमेरा बोलायला पाहिजे होती. हे दुर्दैव आहे, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मला देवेंद्र फडवणीसांकडून जास्त अपेक्षा होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Maharashtra Crisis: ठाकरेंची ‘लढाई’, सिब्बलांकडून कायद्याचा किस, वाचा 10 मुद्दे

सहा महिन्यांपासून सरकारने राज्यातील प्रकल्प बाहेर पाठवण्याचं काम केलं आहे. स्वतःच्या पब्लिक सिटीवर लाखो रुपये खर्च करण्याचे काम केलं आहे. महागाई वाढवणे हे त्यांचे काम आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सहा महिने झाले एका एका मंत्राकडे सहा सहा खाती आहेत. आज विजेचा केवढा मोठा प्रश्न झाला उभा झाला आहे असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

पुण्यामध्ये कोयता गॅंग हा प्रकार आम्हाला माहिती नव्हता, तो सुरू झाला आहे. आज एका पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे, याची जबाबदारी कोण घेणार? हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत हे मी म्हणत नाही. हा त्यांच्या सरकारचा आकडा आहे. कोकणामध्ये सत्य बोलणाऱ्या पत्रकाराची हत्या होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सहा खात्याचे काम राज्यांमध्ये होत आहे की नाही अशी परिस्थिती आता राज्यांमध्ये निर्माण झाली आहे, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Mohan Bhagwat भेट, गाय राष्ट्रीय प्राणी, ओम-अल्लाह एक : अर्शद मदनी अन् वाद…

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नोव्हेंबर २०१९ मधील ‘पहाटेच्या शपथविधीला’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT