OBC Reservation : …त्यावेळी लोकांनी मला ट्रोल केलं; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

मुंबई तक

महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला. बांठिया आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एका ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फडणवीस नेमकं काय म्हणाले? “महाराष्ट्रात यापुढील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला. बांठिया आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एका ताशेरे ओढले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रात यापुढील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसी समाजाचा हा फार मोठा विजय आहे. गेली अडीच वर्ष आम्ही संघर्ष करत होतो. त्या संघर्षाचं फळ मिळालय असं मी मानतो. उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेत आल्यानंतर १३ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करून इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिला होता,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

Supreme Court :बांठिया आयोगानुसार निवडणुका घ्या, दोन आठवड्यात कार्यक्रम जाहीर करा

“दुर्दैवाने १५ महिने सरकारने ओबीसी आयोग गठित केला नाही. ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. १५ महिने राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत होतं. महाविकास आघाडी सांगत होती की, केंद्राने लोकसंख्या दिली नाही. त्याही वेळी मी सांगत होतो की, केंद्राच्या जनगणनेच्या आधारावर हे आरक्षण मिळणार नाही, तर न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टप्रमाणे मिळेल,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp