BMC Election 2022 ‘शेवटची निवडणूक’! उद्धव ठाकरेंचं आव्हान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘2019 लाच प्रयत्न केला, पण…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

परतीच्या पावसाने मुंबईकर गारठले असले, तरी मुंबईतील राजकीय वातावरण मात्र कमालीचं तापलंय. त्याला कारण म्हणजे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक. याच निवडणुकीवरून शिवसेना विरुद्ध भाजप-शिंदे गट आमने सामने आलेत आणि मुंबई महापालिकेची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांच्या शैलीत शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

बुधवारी (२१ सप्टेंबर) शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर टीकेची तोफ डागली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर बोट ठेवत, ‘होय, तुमच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक’, असं सांगत इशारा दिला.

शेवटची निवडणूक मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय. अडीच वर्षांपूर्वी केलेल्या महाविकास आघाडीचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंना उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

‘मुंबईकरांचं ठरलंय म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय’; आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपचं उत्तर

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना काय उत्तर दिलं?

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरूप होतं. त्यांना माझा सवाल आहे की, आम्ही तर लिगल निवडून आलो मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खूपसला, त्यावेळी का राजीनामे दिले नाही? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत?”, असे प्रश्न फडणवीसांनी ठाकरेंना विचारलेत.

ADVERTISEMENT

“तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत निवडून आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात. मोदीजींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले होतात. हिम्मत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं भाषण निराशेचं होतं”, असंही फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

‘न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण…’; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असं ते म्हणाले. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो किया होता है, वही होता है जो मंजूरे ख़ुदा होता है’. तुम्ही 2019 लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकले नाहीत. यापुढे संपवू शकणार नाहीत”, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT