देवेंद्र फडणवीस म्हणाले बाळासाहेबांच्या स्मारकात वैयक्तिक बैठका नकोत, उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर…

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. अशात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर खासगी आणि वैयक्तिक बैठकांसाठी कामांसाठी होऊ नये, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यानंतर आता त्यावर आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वेळेला असं असतं की आपण चित्रपट काढतो. संजयनेही बाळासाहेबांवर दोन चित्रपट काढले. तो निर्माता होता पण मला काही तो सिनेमांमध्ये दिसला नाही. तसं काही लोक सिनेमा काढतात आणि त्यात स्वतःचीच प्रतिमा जास्त दाखवतात. तसं या स्मारकात काहीही नसणार. या स्मारकात बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट लोकांना पाहता येईल. हा जीवनपट पाहिल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळेल. आम्ही त्या स्मारकात दुसरं कुणीही डोकावणार नाही.

भाजपने स्मारकाचा ताबा सरकारने घ्यावा अशी मागणी केली आहे

भाजपने बाळासाहेबांच्या स्मारकाचा ताबा राज्य सरकारने घ्यावा ही मागणी केली आहे. मला वाटतं त्यांना स्मारकाचा नाही त्यांना संपूर्ण देशाचाच ताबा हवा आहे. त्यामुळे स्मारकाचा ताबा मागितला तर त्यावर काय बोलणार? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सगळंच लुटायचं हा भाजपचा मनसुबा आहे. मनात मांडे खाणं काही हरकत नाही तो लोकशाहीचा अधिकार आहे तो त्यांनी जरूर करावा.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निश्चित झालेली आहे. या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जनतेचं स्मारक आहे. स्मारकाच्या समितीत कोण आहे याबाबत आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. स्मारकाचं काम लवकर झालं पाहिजे हीच आमची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी स्मारकाचा निधी उपलब्ध करून दिला आणि जागा उपलब्ध करून दिली. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT