धुळे: निलंबनाची प्रत हातात पडताच एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका

मुंबई तक

रोहिणी ठाकूर, धुळे धुळ्यात वीस ते बावीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आजही आंदोलन सुरू असताना प्रशासनाच्या वतीने 36 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची नोटीस देण्यात आली. मात्र, चालक असलेल्या मनोहर पाटील (वय 38) यांना निलंबनाची प्रत हातात पडताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मनोहर पाटील यांना हिरे शासकीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रोहिणी ठाकूर, धुळे

धुळ्यात वीस ते बावीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आजही आंदोलन सुरू असताना प्रशासनाच्या वतीने 36 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची नोटीस देण्यात आली. मात्र, चालक असलेल्या मनोहर पाटील (वय 38) यांना निलंबनाची प्रत हातात पडताच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

दरम्यान यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मनोहर पाटील यांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे.

दरम्यान 36 पैकी 35 कर्मचाऱ्यांनी निलंबनाचे प्रत हातात घेऊन एकमेकांचा सत्कार करत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत राज्यशासन तसेच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन सुरुच ठेवलं.

याानंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या प्रत जाळून त्याची होळी केली आणि शासनाचा निषेध नोंदवला.

आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका

जो पर्यंत महामंडळाचे विलगीकरण राज्य शासनामध्ये होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही केलेला संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

‘करो या मरो; या भूमिकेमध्ये सध्या तरी आंदोलनकर्ते पाहायला मिळतात. दुसरीकडे या परिस्थितीमुळे काही एसटी कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. ज्यामुळे सध्या परिस्थिती ही अत्यंत बिकट बनली असून याबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी आता केली जात आहे.

सरकारकडून विलिनीकरणाचा निर्णय नाही, पण पगारवाढ देण्यास तयार

परिवहन मंत्री अनिल परब यांनी तीम दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली होती की, विलिनीकरणाचा विषय समितीसमोर आहे. मात्र, सरकारकडून पगारवाढ करण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले होते.

‘ज्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

ST Strike: निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

‘ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन आता 17 हजार 80 रुपये झालं आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना आता 24 हजार वेतन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 41 टक्के पगारवाढ झाली आहे.’

‘ज्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 16 हजार आहे त्यांचा पगार 23 हजार 40 होणार आहे. तर 20 वर्षाहून अधिक वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजाराहून झालेला आहे.’

‘याशिवाय मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थूल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचं मूळ वेतन 39 हजार 500 होणार आहे. तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होणार असल्याचं अनिल परब म्हणाले आहेत.’ दरम्यान, आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचंही परब यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp