Disha Salian Death ची फाईल उघडली, फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Disha Salian death Case and SIT: नागपूर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Govt) हिवाळी अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मोठा झटका दिला आहे. दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणाची सोखल चौकशी व्हावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत सातत्याने केली जात होती. त्यामुळे विधानसभेत एकच गदारोळ सुरु होता. अखेर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ज्यामुळे आता भाजपकडून आदित्य ठाकरेंची अधिक कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. (disha salian death file opened devendra fadnavis big announcement after uproar in vidhansabha)

दिशा सालियान प्रकरणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली. ज्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी ही मागणी उचलून धरली. ज्यावरुन दोनदा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य असल्याचं म्हणत हे प्रकरण एसआयटीकडे देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

नागपूर हिवाळी अधिवेशन 2022 Live : दिशा सालियन प्रकरण पेटलं, प्रचंड राडा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही म्हटलं की, ज्यांच्याकडे यासंबंधी काही पुरावे असतील तर ते त्यांनी ते संबंधिच पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करावे. यामुळे आता हे संपूर प्रकरण नेमकं कोणतं वळणं घेतं याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

याआधी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आमदार भारत गोगावले यांनी देखील दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. पाहा याप्रकरणी भरत गोगावलेंनी काय केली मागणी?

ADVERTISEMENT

दिशा सालियन मृत्यू : आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या रडारवर; विधानसभेत प्रचंड गदारोळ

ADVERTISEMENT

भरत गोगावले म्हणाले, “दिशा सालियने आत्महत्या केली की तिला फेकून दिलं याची निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. दिशा सालियन ही सुशांतसिंह राजपूतचं काम पाहत होती. दोघांमधील मोबाईल संभाषण आणि चॅट्स उघड न होणे, सदर विषयात दिशा सालियनने सुशांतसिंग राजपूतला फोटो पाठवले होते, त्यानंतर दिशाचा संशयास्पद मृत्यू. त्यानंतर सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला.”

“त्याच्या मृत्यूमध्ये सीबीआयने कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही मृत्यूंमध्ये काही साम्य असल्याचं आम्हाला वाटतंय. दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट उघड झालेला नाही. दिशा सालियनच्या मोबाईलमधील संभाषणाची चौकशी होणे आवश्यक आहे. दिल्लीपासून इथेपर्यंत हे प्रकरण गाजतंय. यात खुलासा व्हायला पाहिजे. फेर तपास होणं गरजेचं आहे,” असं भरत गोगावलेंनी विधानसभेत सांगितलं.

दोनच दिवसांपूर्वी नागपूरमधील भूखंडावरुन शिवसेनेने विधिमंडळात जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र, काल संध्याकाळच्या सुमारास खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. तोच मुद्दा उचलून आज (22 डिसेंबर) सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सभागृहात बराच गदारोळ केला. ज्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT