धक्कादायक ! शाळकरी मुलांचं भांडणं, छातीत सुरा खुपसून विद्यार्थ्याचा खून

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाळकरी मुलांच्या भांडणात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. शाहु महाराज विद्यालयातील इयत्ता दहावीच्या दोन तुकड्यांमधील झालेल्या भांडणात मुलांनी एका विद्यार्थ्याच्या छातीत सुरा खपसून त्याचा खून केला आहे.

ADVERTISEMENT

ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आज तुंबळ हाणामारी झाली. प्रगती हॉस्पिटलजवळील पाईपलाईन ब्रिजवर शाळेतील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ज्यात तीन विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षीय तुषार गोरख साबळे याच्या छातीत सुरा खुपसून त्याची हत्या केली.

तुषारवर झालेला हल्ला हा इतका भीषण होता की त्याचा हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच मृत्यू झाला. या प्रकरणात तिन्ही अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT