ऐन दिवाळीत मुसळधार पावसाने कोकण-पुण्याला झोडपलं, शेतकरी-व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंधुदुर्ग: दिवाळीत देखील पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पडत असणाऱ्या पावसाने हाहाकार उडवला आहे. गेले तीन ते चार तास या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे इथल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

ADVERTISEMENT

दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 गावांना बसला आहे. माणगाव, साळगाव, आकेरी, नानेली, वाडोस, कालेली, वसोली, शिवापूर, निळेली या भागांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांनी आपले पिकलेले भात दोन-चार दिवसापूर्वी कापून ठेवलेले होते. पण आता हा कापलेला भात पाण्यात बुडून गेला आहे. तर काही ठिकाणी सतत पाण्याखाली भात गेल्याने त्याल कोंब यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हे वाचलं का?

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात गडगडाट मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारीच जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पाऊस पडल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोरोनानंतर दोन अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच बाजारपेठा फुलल्या होत्या. त्यामुळे व्यवसाय चांगला होईल अशी व्यापाऱ्यांना आशा होती. पण ऐन वेळी पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात देखील मुसळधार पाऊस

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोह कवठे परिसराला तसेच खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले.

अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तर दीपावलीनिमित्त उघड्यावर भरलेल्या बाजारपेठतील व्यापाऱ्यांची देखील तारांबळ उडाली. दरम्यान, आज पडलेल्या या पावसाने ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना मात्र जीवदान मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT