पंतप्रधान होता आलं नाही याची खंत वाटते का?; शरद पवार म्हणतात…
राहुल बजाज यांनी शरद पवार यांच्याबाबत पंतप्रधान जे भारताला कधीच मिळाले नाहीत असा उल्लेख केला होता. यासंदर्भात शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान होता आलं नाही त्याची खंत वाटते का? असा प्रश्न मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत साहिल जोशी यांनी शरद पवार यांना विचारला तेव्हा याबाबत शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. जाणून घ्या पंतप्रधानपद मिळालं नाही […]
ADVERTISEMENT
राहुल बजाज यांनी शरद पवार यांच्याबाबत पंतप्रधान जे भारताला कधीच मिळाले नाहीत असा उल्लेख केला होता. यासंदर्भात शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान होता आलं नाही त्याची खंत वाटते का? असा प्रश्न मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत साहिल जोशी यांनी शरद पवार यांना विचारला तेव्हा याबाबत शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
जाणून घ्या पंतप्रधानपद मिळालं नाही याची खंत वाटते का? या प्रश्नावर शरद पवार थोडसं हसले आणि म्हणाले, ‘मला अजिबात खंत वाटत नाही. मला आठवतंय 1952 ते 1958 या कालावधीत मी युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो. तेव्हा वाटायचं की कधी तरी विधानसभेत गेलं पाहिजे. विधानसभेत गेल्यावर सरकारमधे काम करायला मिळेल का? इथपर्यंत आम्ही गेलो. तो एक कालखंड असतो, वय असतं, जिद्द असते. आज मी 81 वर्षांचा आहे. त्यामुळे आज हे करण्याचा कालखंड नाही. आता नवीन नेतृत्व कसं तयार होईल आणि त्यामार्फत देशाचं चित्र कसं योग्य दिशेने जाणारं कसं बनू शकतं यावर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत’ असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई तक या वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलला प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत विविध विषयांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि इंडिया टुडेचे सिनीयर एक्झुकिटिव्ह एड़िटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरं दिली आहेत.
हे वाचलं का?
शरद पवारांनी केलं संघाचं कौतुक
प्रागतिक विचारांच्या शक्ती या तुलनात्मकदृष्ट्या दुबळ्या झाल्या. याचा फायदा कोण घेऊ शकतं? अतिरेकी भूमिका घेऊन जनमानसात विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करणारे काही कमिटेड लोक असतात. त्यांना त्यामध्ये यश मिळतं. असं असलं तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे आज भाजपकडे एक संघटन (RSS) आहे. आजचा भाजप बऱ्याच बाबतीत काँग्रेसच्या जवळ जातो आहे. मात्र कमिटेड लोक त्या संघटनेत आहेत.
ADVERTISEMENT
मी नागालँडमधे होतो. विमानतळावर मला एक गृहस्थ दिसले. त्यांच नाव सांगत नाही पण तो चेहरा मला परिचित होता. मी त्यांना विचारलं इथे काय करतो? तर त्याने मला उत्तर दिलं ‘संघाने मला इथे 20 वर्षे काम करायला सांगितलं आहे. कॉलेज सोडल्यावर तू इथेच आहे का? तर तो हो म्हणाला. तुझं घरदार कोण चालवतं? संघाकडून मिळालेले दोनशे रूपये घरी जातात. माझी इथली व्यवस्था संघाचे लोक करतात. लक्षात घ्या. 29 वर्ष नागालँडसारख्या ठिकाणी राहणं. जी काही विचारधारा असेल. मला आवडत नसेल. पण त्यांना आवडत असेल, तर त्याच्यासाठी एवढा त्याग, समर्पणाची तयारी असलेला संच असेल तर ही भाजपची जमेची बाजू आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT