तुमच्या मोबाईलमध्ये सुविधा आहे पण 5G चालत नाही? पुढच्या 24 तासात सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

या महिन्याच्या सुरुवातीला 5G लाँच करण्यात आले होते. Jio आणि Airtel ने अनेक शहरांमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. परंतु, Apple, Samsung आणि इतर फोन ब्रँडमध्ये 5G सपोर्ट असूनही, बहुतेक लोक ते वापरू शकत नाहीत.

ADVERTISEMENT

लोक सॉफ्टवेअर अपडेटची वाट पाहत आहेत

याबाबत फोन ब्रँडकडून सॉफ्टवेअर अपडेट जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतरच लोक त्यांच्या स्मार्टफोनवर 5G सेवा वापरू शकतील. म्हणजेच, सॅमसंग आणि आयफोनची बहुतेक मॉडेल्स अद्याप हाय-स्पीड इंटरनेटसाठी तयार नाहीत.

हे वाचलं का?

आता भारत सरकारही ही समस्या गांभीर्याने घेत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या दूरसंचार आणि आयटी विभागाच्या उच्च नोकरशहांची उद्या म्हणजेच बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये स्मार्टफोन कंपन्यांची याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.रिपोर्टनुसार, अॅपल, सॅमसंग, विवो आणि शाओमी व्यतिरिक्त या बैठकीत देशांतर्गत मोबाईल कंपन्याही सहभागी होणार आहेत. याशिवाय टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया देखील यामध्ये उपस्थित राहणार आहेत.

भारत 5G साठी मोठी बाजारपेठ आहे

ADVERTISEMENT

दरम्यान , टेलिकॉम कंपन्यांव्यतिरिक्त Apple, Samsung, Vivo, Xiaomi यांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. या संदर्भात सरकारकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. चीननंतर भारत 5G साठी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे बोलले जात आहे. या वर्षीच 5G चा लिलाव पूर्ण झाला आहे. आता बहुतेक खाजगी दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सुरू केली आहे. तथापि, 5G फक्त निवडक ठिकाणांहून सुरू करण्यात आले आहे. पण, कंपन्यांनी पुढच्या वर्षापर्यंत देशातील बहुतांश भाग 5G नेटवर्कने जोडण्याचे आश्वासन दिले आहे.

ADVERTISEMENT

सुरुवातीला या शहरांमध्ये 5G

सुरुवातीला कंपन्या फक्त मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरु झाली आहे. प्रथम दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे सेवा सुरू केल्या जातील, ज्या नंतर इतर शहरांमध्ये विस्तारल्या जातील. जिओने आपल्या 5G रोलआउट प्लॅनमध्ये म्हटले आहे की ते पुढील दोन वर्षांत देशभरात 5G सेवा सुरू करतील. तर, 5G योजनांसाठी ग्राहकांना 4G पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. टेलिकॉम कंपन्यांनी अद्याप 5G रिचार्ज प्लॅनबद्दल कोणतीही ठोस माहिती शेअर केलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT