डॉक्टरचा नर्सवर बलात्कार, बलात्कारानंतर पीडिता गरोदर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज़का खान, वाशिम: वाशिमच्या रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टर गोपाल इंगोले याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून डॉक्टर विरोधात रिसोड पोलिसांत अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रिसोडच्या डॉ. गोपाल इंगोले याच्यासोबत असणाऱ्या रुग्णालयात अनैतिक संबंधामुळं नर्स महिला गर्भवती राहली होती. दरम्यान, या महिलेचा गर्भपात करण्यात आला होता. पण आता हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तो पुरलेला गर्भ बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने रिसोड पोलिसांत तक्रार दिल्याने डॉक्टर गोपाल इंगोले विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण डॉक्टर इंगोलेने आपल्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारण पुढे केल्याने त्याला अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान, मृत गर्भाचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर डीएनए चाचणीवरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेने दिलेल्या तक्ररीमध्ये नमूद केले आहे की, तिचा पती खाजगी ड्रायव्हर असून कुटुंबास आर्थिक हातभार लावण्याकरीता ती 2021 साली डॉक्टर गोपाल इंगोले यांच्या बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह येथे नर्सचे काम करायची. त्यासाठी तिला 5000 रुपये महिना मिळत असे.

ADVERTISEMENT

तेथे काम करीत असताना, सुरुवातीला डॉक्टर गोपाल त्यांच्या केबिनमध्ये बोलावयचा आणि काही काम नसताना सुध्दा माझ्याकडून इतर कामं करुन घ्यायचा. यावेळी तो केबिनमध्ये माझा हात पकडून मला म्हणायचा की, तुझ्या घरचे चांगले नाहीत. तू तुझ्या घरच्यांना सोडुन दे, मी तुझा सांभाळ करेल… तुझा पगार वाढवून देईल. तू माझ्यासोबत संबंध ठेव. असे त्याने चार-पाच वेळा केले. तेव्हा मी त्यांना नाही म्हणायचे. अनेकदा मी त्याचा हात झटकून बाहेर निघून जायची. पण भीतीपोटी मी हा बाब घरी सांगत नव्हते.

ADVERTISEMENT

त्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी दिनांक 20 अक्टोबर 2021 रोजी आरोपी डॉक्टर इंगोले मला त्याच्या केबिनमध्ये बोलावले. तेव्हा सकाळचे साडे अकरा वाजले असतील. तेव्हा डॉक्टरची पत्नी बाहेर गेली होती. डॉक्टर गोपालने केबिनमध्ये बोलावताच केबिनचा दरवाजा बंद करुन बळजबरीने माझ्यावर अत्याचार केला. तसेच या प्रकरणात धमकी देखील दिली की, कोणाला सांगितले तर परिणाम वाइट होतील.

त्यादिवसापासून आरोपी डॉक्टर गोपाल मला केबिनमध्ये बोलवायचा व जबरदस्ती करायचा. साधारण तीन महिने हा अत्याचार सुरु होता. तीन महिन्यानंतर सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने डॉक्टरकडचे काम सोडून दिले होते.

मुंबईतल्या धारावीत १९ वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार

परंतु, जबरीने केलेल्या संभोगामुळे आरोपी डॉक्टर इंगोलेपासून महिला गरोदर झाली होती. पीड़ित महिलेने ही बाब डॉक्टर इंगोले याला सांगितल्यावर त्याने स्पष्ट नकार देत सांगितले की, हे बाळ माझे नाही.

एप्रिल 2022 च्या एक दोन तारखेला महिलेच्या पतीला पोटाचा आकार मोठा झालेला व वाढलेला दिसला, तेव्हा तिच्या पतीने विचारले असता तिने सर्व हकीकत पतीला सांगितली.

आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT