Dombivli Crime: दारू पार्टीनंतर तिघांनी मिळून एका तरुणाचे छाटले लिंग

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Three people cut off a youth’s penis with blade: डोंबिवली: सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत (Dombivli) एक अत्यंत भयंकर आणि सर्वच डोंबिवलीकरांना हादरून टाकणारी एक घटना घडली आहे. दारू पार्टीनंतर (liquor party) तीन तरुणांनी मिळून चक्क एका तरुणाचे ब्लेडने लिंगच छाटलं. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (dombivli crime after liquor party three gangs cut off a youths penis with blade)

ADVERTISEMENT

या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तर पीडित संजय कुमारला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित संजय कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. डोंबिवलीतील गोळवली परिसरात ही घटना घडली आहे.

Crime: महिलेसाठी खुळावला.. घेतला तिच्याच मुलाचा जीव, कल्याणमधील थरारक घटना

हे वाचलं का?

नेमकं घडलं तरी काय?

संजय कुमार, सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम डोंबिवलीतील गोळवली परिसरात एका खोलीत एकत्र राहत होते. हे चौघेही एमआयडीसीतील जिम्नॅस्टिक कंपनीत कार्यरत होते. संजय कुमार आणि आरोपींनी मंगळवारी रात्री घरी पार्टी करण्याचे ठरवले होते. पार्टीसाठी त्यांनी मासे आणि देशी दारू आणली. सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं आणि नंतर एकत्र मिळून दारू पार्टी केली. त्यानंतर अचानक त्यांच्यात भांडण सुरू झालं.

या भांडणामुळे सोनू, करण आणि सुरेंद्र यांनी संजय कुमारला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर तिघांनी मिळून ब्लेडने संजय कुमारचे लिंगच छाटले. यामध्ये संजय कुमार हा गंभीर जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुमारची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी कारवाई करत सोनू राम, करण राम, सुरेंद्र राम यांच्याविरुद्ध कलम 307, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आणि तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या घटनेमागे प्रेमप्रकरण किंवा कौटुंबिक वाद असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. पण या घटनेमागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न मानपाडा पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

Crime : दोन प्रेमवीर एकाच प्रेयसीसाठी भिडले अन् घात झाला!

काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा आणि उल्हासनगर आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.

1. कल्याणमधील गौरी पाडा परिसरात लग्नाला नकार दिल्याने विधवा महिलेचा सात वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली.

2. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणातून एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराची हत्या केली.

3. अंबरनाथ हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम प्रकरणात प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केली.

4. टिटवाळ्यातही प्रेम प्रकरणात विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केली आहे.

या चार गंभीर घटना मागील आठ दिवसातील आहेत. त्यामुळे कल्याण आणि परिसरात कायद्याचा धाक राहिलेलाच नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT