डोंबिवली : शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकरसह दोघांना पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. डोंबिवलीत याच मुद्द्यावरून शिवसेना शाखेत वाद झाला. या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुलेंना अटक करण्यात आली आहे. ‘तुम्ही कोणत्या गटात आहात’, या कारणावरून डोंबिवलीत एका शाखेत जोरदार वाद झाला. या वादानंतर शाखेतून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. डोंबिवलीत याच मुद्द्यावरून शिवसेना शाखेत वाद झाला. या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुलेंना अटक करण्यात आली आहे.

‘तुम्ही कोणत्या गटात आहात’, या कारणावरून डोंबिवलीत एका शाखेत जोरदार वाद झाला. या वादानंतर शाखेतून कागदपत्र आणि पैसे चोरीच्या आरोपावरून शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुले या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली गेली. यात काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहरप्रमुखपदी विवेक खामकर यांची निवड करण्यात आली. शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेना मध्यवर्ती शाखेतून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून टाकण्यात आले. यात खामकर यांची महत्वाची भूमिका होती, अशी चर्चा आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर, श्याम चौगुले आणि इतर दोघे डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत पोहोचले. शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे बसले होते. ‘विवेक खामकर यांनी शाखेत येऊन आम्हाला विचारलं तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही कोणत्या गटात आहात. मी त्यांना सांगितले अजून मी शिवसेनेत आहे. कोणत्याही गटात गेलो नाही,’ असं परेश म्हात्रे यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp