Donald Trump : स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात 34 आरोप; ट्रम्प म्हणाले, ‘मी निर्दोष’
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 34 आरोप करण्यात आले. मात्र, ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ADVERTISEMENT
Donald Trump Stormy Daniels case : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न चित्रपट स्टारला गुप्त पद्धतीने पैसे देण्याच्या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलाने 34 आरोप केले आहेत. स्टॉर्मी डॅनियल्सच्या वकिलाने केलेले आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावले असून, ‘मी निर्दोष आहे’, असं कोर्टात सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांना पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. (34 criminal charges against Donald trump in illegal payment to Pornstar Stormy Daniels)
ADVERTISEMENT
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गोपनीय पद्धतीने पैसे दिल्याच्या प्रकरणाची मॅनहट्टन न्यायालयात सुनावणी झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजेपर्यंत ही सुनावणी चालली. पुढील वर्षी जानेवारीपासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील प्रकरणाची सुनावणी सुरू केली जाऊ शकते, असं न्यायालयाने सांगितले.
हेही वाचा – ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या रात्री…’, पॉर्न स्टारच्या आरोपांनी अमेरिकेत खळबळ
सुनावणीवेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले. मात्र, हे आरोप ट्रम्प यांनी फेटाळून लावले. त्याचबरोबर आपण निर्दोष असल्याचं ते म्हणाले.
हे वाचलं का?
डोनाल्ड ट्रम्प यांना अटक
अमेरिकेतील मॅनहट्टन न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प हजर झाले. हजर होण्याआधी त्यांना काही वेळासाठी ट्रम्प यांना अटक करण्यात आले होते आणि जिल्हा अॅटर्नींच्या कार्यालयात काही गोष्टींची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नेण्यात आले होते.
ट्रम्प यांच्यावर गुप्तता ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप
सुनावणीवेळी फिर्यादीच्या वकिलांनी असा आरोप केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्त गोष्टींबद्दल मौन बाळगण्यासाठी अवैध पद्धतीने 13,000 डॉलर्स दिले. पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची माहिती समोर आल्यास राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पैसे दिले गेले.
ADVERTISEMENT
ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी ट्रम्प यांच्यासोबत पॉर्न स्टारच्या असलेल्या संबंधाची माहिती दडवण्यासाठी नियमांचं उल्लंघन करून स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 मध्ये पैसे दिले होते. दरम्यान, अशा प्रकारचा खटला दाखल झालेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प-स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण नेमकं काय?
-डोनाल्ड ट्रम्प हे न्यायालयात हजर होण्यापूर्वी मॅनहट्टन कोर्ट ते ट्रम्प टॉवर या दरम्यान तब्बल 35,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
– डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक असा आरोप केला की, या प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्यायाधीश हे डेमोक्रटिक आहेत.
कोर्टातून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
न्यायालयातील सुनावणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील त्यांच्या घरी माध्यमांशी संवाद साधला. ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. आपला देश गर्तेत जात आहे. अनेक गोष्टींमुळे जग आपल्यावर आधीच हसत आहे. मला विश्वास बसत नाही की, सर्व अमेरिकेत होत आहे. मी एकच गुन्हा केला आहे आणि तो म्हणजे हा की आपल्या देशाला जे रसातळाला नेऊ इच्छितात, त्या लोकांपासून निर्भयपणे वाचवलं आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT