अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे रविवारी रात्री झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या ड्रायव्हरला रविवारी रात्री जुहूच्या जेव्हीपीडी जंक्शन येथे किरकोळ वादावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे
रविवारी रात्री झालेल्या या घटनेत निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे सेडान पद्धतीची गाडी होती. निवेदिता सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी नाशिक नोंदणीकृत या सेडान गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्तीचा अद्याप शोध लागला नसला तरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे.
याबद्दल अभिनेत्री निवेदिता सराफ ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की विलेपार्ले येथून घरी परतत असताना रात्री १०. ३० च्या सुमारास जेव्हीपीडी जंकशन सिग्नल लागल्यावर रस्त्यावर थांबलो असता, मागून संबंधित सेडान चालकाने धडक दिली