अमली पदार्थ तालुका आणि छोट्या शहरांत येऊन पोहचले, समुळ उच्चाटन करण्याची गरज – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई तक

सध्या राज्यभरात NCB ने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मुंबईच्या NCB युनिटने केलेल्या कारवाईमुळे सध्या राज्य सरकार विरुद्ध NCB असा सामना रंगताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे. सध्याच्या घडीला ड्रग्ज हे तालुका आणि छोट्या शहरांपर्यंत येऊन पोहचले आहेत. या गोष्टींचं समुळ उच्चाटन करण्याची गरज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या राज्यभरात NCB ने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मुंबईच्या NCB युनिटने केलेल्या कारवाईमुळे सध्या राज्य सरकार विरुद्ध NCB असा सामना रंगताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

सध्याच्या घडीला ड्रग्ज हे तालुका आणि छोट्या शहरांपर्यंत येऊन पोहचले आहेत. या गोष्टींचं समुळ उच्चाटन करण्याची गरज आहे. राज्य सरकार त्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलत असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षापदी निवड झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते रूपाली चाकणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या भाषणात, मागील महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह महत्वाच्या विषयांवर भाष्य केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे मोठा निर्णय घेणार? फेसबूक पोस्ट चर्चेत

हे वाचलं का?

    follow whatsapp