आधी मैत्रिणीसोबत भरपूर दारु प्यायला, 2 व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या; नंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

men died after lot of drunk alcohol and 2 vigara pills
men died after lot of drunk alcohol and 2 vigara pills
social share
google news

Men death due to Alcohol and Viagra Pills: एका माणसाने खूप मद्यपान (Alcohol) केले, त्यानंतर त्याने 2 व्हायग्राच्या (Viagra) गोळ्या घेतल्या. यानंतर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्याचा मृत्यू (Death) झाला. ‘जर्नल ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन’मध्ये त्या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टमची माहितीही सविस्तर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (drunk a lot consumed 2 viagra tablets without advice then died due to stroke)

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं?

या व्यक्तीचे शवविच्छेदन करणारे एम्सचे डॉ. जय नारायण पंडित म्हणाले – त्या व्यक्तीला स्लिडानाफिल (व्हायग्रा) औषध घेण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता. असे असतानाही त्याने ते औषध प्राशन केले होते. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, हा व्यक्ती त्याच्या एका महिला मैत्रिणीसोबत हॉटेलच्या एका रूममध्ये थांबला होता. जिथे त्याने 50 mg च्या Viagra च्या दोन गोळ्या खाल्ल्या होत्या.

हे वाचलं का?

अधिक वाचा- जास्त पाणी पिणं ठरु शकतं आरोग्याला धोकादायक; किती असावं दिवसाचं प्रमाण?

मात्र, जर्नलमध्ये छापून आलेल्या अहवालात या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आलेली नाही. त्या व्यक्तीचा रक्तदाब खूप वाढल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तो आधीच प्रचंड दारूच्या नशेत होता. रक्तातील अल्कोहोलची पातळी देखील शरीरात निर्धारित मानकांपेक्षा दुप्पट होती.

जेव्हा त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. त्या व्यक्तीने कोणत्या ब्रँडचे औषध सेवन केले याचा उल्लेख वैद्यकीय जर्नलमध्ये करण्यात आलेला नाही. भारतात कुठे हे प्रकरण समोर आले, रुग्ण कोण होता. या गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- मॉडेल जिममध्ये करायची एकच काम, जिम मालकाने थेट काढलं बाहेर!

दारू पिऊन आणि व्हायग्राची गोळी घेतल्यानंतर त्या व्यक्तीला डोकेदुखी आणि उलट्या झाल्या. मात्र, असे असूनही पुरुषाच्या महिला मैत्रिणीने कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही. महिलेने असा दावा केला आहे की, त्या व्यक्तीला यापूर्वीही अशी लक्षणे दिसली होती.

ADVERTISEMENT

‘सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका’

या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरांनी असेही सांगितले की, या प्रकरणावरून असे दिसून येते की, लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. डॉक्टरांनी सांगितले की, अनेकदा पुरुष लैंगिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे औषध घेतात.

रक्तदाब वाढला, अन्…

या प्रकरणाशी संबंधित पॅथॉलॉजिस्टने सांगितले की, एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराच झटका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे दारू पिल्यानंतर व्हायग्राचे सेवन करणे. दारू प्यायल्यामुळे त्या व्यक्तीचा रक्तदाब आधीच वाढला असेल. जेव्हा त्याने ही व्हायग्राची गोळी घेतली तेव्हा मेंदूच्या नसांवर दबाव आला असणार. यामुळे त्या व्यक्तीला झटका आला.

अधिक वाचा- Mumbai : लोकलमध्ये थरकाप उडवणारी घटना; अपंग व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालात व्यक्तीच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी 186.61 mg/100 ml असल्याचे समोर आले. जे की 80 mg/100 ml असायला हवे होते.

1000 पैकी एकाला येतो व्हायग्राच्या सेवनाने स्ट्रोक

डेलीमेलच्या वृत्तानुसार – Viagra ही गोळी प्रसिद्ध फार्मा कंपनी Pfizer ने बनवली आहे. ब्रिटनमध्ये आरोग्यसेवा नॅशनल हेल्थ सर्व्हिस (National Health Service) व्हायग्रा उपलब्ध करून दिलेली नाही. NHS ने ही व्हायग्राबाबत हा इशारा दिला आहे. NHS म्हणणं आहे की, 1000 पैकी एकाला स्ट्रोक होण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT