शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, संजय राऊतांचं शिंदे सरकारला ओपन चॅलेंज
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असं म्हणत संजय राऊत यांनी तुरुंगातून शिंदे सरकारला ओपन चॅलेंज दिल्याची चर्चा आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी ३ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशात संजय राऊत यांचे भाऊ, वकील आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी राऊत यांची भेट घेतली. त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असं म्हणत संजय राऊत यांनी तुरुंगातून शिंदे सरकारला ओपन चॅलेंज दिल्याची चर्चा आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी ३ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशात संजय राऊत यांचे भाऊ, वकील आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी राऊत यांची भेट घेतली. त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय.
शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा करण्याचा निर्धार
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची संमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा ही ठाकरेंचीच आहे.
त्यामुळे शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच झाला पाहिजे. आपल्याला संमती मिळो किंवा न मिळो शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात जाव त्याचा त्याचा ताबा घ्यावा आणि मेळावा घ्यावा असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. ज्यामुळे त्यांनी एक प्रकारे शिंदे सरकारला ओपन चॅलेंजच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत तुरुंगात लिहित आहेत पुस्तक
शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगात पुस्तक लिहित आहेत. ऑर्थर रोड तुरुंगात हे पुस्तक संजय राऊत लिहित आहेत. हे पुस्तक PMLA च्या सेक्शन 50 वर आधारित आहे. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत हे एकटेच त्यांच्या लॉकअपमध्ये आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यांना सोमवारी १३ दिवसांनी सूर्य दिसला, असे त्याने त्याला भेटायला आलेल्या लोकांना सांगितले होते.