दीड वर्षांचा मुलगा असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत संबंध, तरूणीने वरात येण्याआधी उचललं भयंकर पाऊल
Crime news: कानपूरमधील (kanpur) एका फ्लॅटमध्ये (couple suicide ) प्रेमी युगुलाचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. मयत मुलीच्या हातात बांगड्या, कपाळावर सिंदूर, कपाळावर बिंदी आणि ओठावर लिपस्टिक होती. मुलीचे लग्न झालेले नसून 26 फेब्रुवारीला तिचं लग्न होणार असल्याचे (Getting married on 26 February) सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मयत तरुण विवाहित असून त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे. […]
ADVERTISEMENT
Crime news: कानपूरमधील (kanpur) एका फ्लॅटमध्ये (couple suicide ) प्रेमी युगुलाचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. मयत मुलीच्या हातात बांगड्या, कपाळावर सिंदूर, कपाळावर बिंदी आणि ओठावर लिपस्टिक होती. मुलीचे लग्न झालेले नसून 26 फेब्रुवारीला तिचं लग्न होणार असल्याचे (Getting married on 26 February) सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मयत तरुण विवाहित असून त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे. (after Postmortem) पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यानंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ADVERTISEMENT
Satara Crime News : घराबाहेर झोपलेल्या तरुणाला अज्ञाताकडून गळा चिरुन खून
दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांना लग्न करायचे होते, पण लग्न होऊ शकले नाही. कदाचित त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी. पण, मरण्यापूर्वी तरुणाने तरुणीची मागणी पूर्ण केली असावी आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी, असं बोललं जात आहे. वास्तविक, ही घटना शनिवारी शहरातील पंकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. परिसरात राहणारा तरुण आणि तिथे राहणारी तरुणी यांच्यात खूप वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनाही लग्न करायचे होते, पण घरचे लोक लग्नासाठी तयार नव्हते.
हे वाचलं का?
प्रियकर विवाहित होता, एक मूलही होते
लग्नानंतर तरुण आपल्या घरातील कामात व्यस्त होऊन आपल्या प्रेयसीला विसरून जाईल, या विचाराने सुमारे 3 वर्षांपूर्वी तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचे अन्यत्र लग्न लावून दिले. लग्नानंतर प्रियकर मुलाचा बाप झाला. यानंतरही तो प्रेयसीच्या संपर्कात राहिला.
पत्नी तिच्या माहेरी गेली होती
पतीने आपल्या मैत्रिणीच्या संपर्कात असणे पत्नीला आवडत नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पतीवर नाराज होऊन दीड वर्षापूर्वी पत्नी मुलाला घेऊन माहेरी गेली होती. पत्नी माहेरी गेल्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीच्या भेटीगाठी वाढू लागल्या. कुटुंबीयांच्या निर्बंधांना कंटाळून तरुणाने घर सोडले आणि पंकी परिसरातच भाड्याने फ्लॅट घेतला होता. या फ्लॅटवर त्याची प्रेयसी ये-जा करू लागली.
ADVERTISEMENT
Crime News : दिव्यांग मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
ADVERTISEMENT
प्रेयसीच्या लग्नाची वरात 26 फेब्रुवारीला येणार होती
तरुणीचे लग्न ठरले होते. तिचं लग्न 26 फेब्रुवारीला होतं. ही गोष्ट प्रियकरालाही माहीत होती. मुलीच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती, मात्र ती प्रियकराला विसरायला तयार नव्हती. त्यामुळेच 16 फेब्रुवारीला तरुणी तिच्या मामाच्या घरी जाण्यास सांगून प्रियकराच्या फ्लॅटवर पोहोचली.
प्रियकर आणि प्रेयसीचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले
16 फेब्रुवारी रोजी प्रियकराला दिवसभर कुटुंबीयांचे फोन आले, मात्र त्याने फोन घेतला नाही. कुटुंबीयांनी फ्लॅटवर येऊन दरवाजा ठोठावला असता दरवाजाही उघडला नाही. घाबरून त्यांनी पाणकी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. बराच वेळ परिश्रम घेतल्यानंतर पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला.
आत पाहिलं तर खोलीत दोघांचे मृतदेह फासावर लटकलेले होते. शरीरात जीव नव्हता आणि दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला.
तिच्या हातात बांगड्या, माथ्यावर सिंदूर
मैत्रिणीचे लग्न होणार होते आणि 26 तारखेला तिच्या लग्नाची वरात येणार होती. पण, पोलिसांनी तिचा मृतदेह पाहिल्यावर तिच्या भांगेत सिंदूर होतं, तिच्या हातात बांगड्या, कपाळावर बिंदी आणि ओठांवर लिपस्टिक होती. या प्रेमी युगुलाला लग्न करायचे होते, मात्र कुटुंबीय तयार नव्हते, असा पोलिसांना संशय आहे. यामुळे दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला.
पोलिसांचे म्हणणे काय?
या प्रकरणी पंकीचे एसीपी निशांत शर्मा यांनी सांगितले की, फ्लॅटमध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले आहेत. दोघांमध्ये वर्षानुवर्षे प्रेमसंबंध होते. तरुणाचे लग्न झाले असून तरुणीचे लग्न होणार होते. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याचवेळी तरुणाने आधी मुलीची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी आमचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT