मोठी बातमी ! अॅडव्होकेट सतिश उके यांना ईडीकडून अटक, वकिलांची माहिती
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळाला. या संघर्षातला आणखी अंक आज राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये लिहीण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणारे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केली आहे. आज सकाळी ईडीने सतिश उके यांच्या नागपूर येथील घरावर […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळाला. या संघर्षातला आणखी अंक आज राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये लिहीण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणारे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केली आहे. आज सकाळी ईडीने सतिश उके यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी केली होती.
उके यांना ईडीने दुपारी चार वाजता अटक दाखवल्याची माहिती त्यांचे वकील कमल सतुजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. उके यांना अटक केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेलं. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांड घेऊन मुंबईला आणण्यात येणार आहे. मुंबईतील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर ईडी सतिश उके यांची कस्टडी मागेल असं कळतंय. सतिश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांची राजकीय वर्तुळातील उठबस हा चर्चेचा विषय असतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने केलेली कारवाई ही याच अनुषंगाने असू शकते अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.
सतिश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रतिज्ञापत्रात आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती लपवल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असून फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उके यांनी केली होती. तसेच न्यायाधीश लोहा मृत्यू प्रकरणातही उके यांनी गंभीर आरोप केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT