देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील सतीश उकेंच्या घरी ईडीचा छापा
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी ही कारवाई करण्यात आली. पहाटे पाच वाजता ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात बरीच उठबस असते. नाना पटोले यांचं वकीलपत्रही त्यांनी घेतलं होतं. काही […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र विधानसभेचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. नागपूर येथील घरी ही कारवाई करण्यात आली. पहाटे पाच वाजता ही कारवाई झाली. अॅड. सतीश उके यांची राजकीय वर्तुळात बरीच उठबस असते. नाना पटोले यांचं वकीलपत्रही त्यांनी घेतलं होतं.
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने टाकला असू शकतो अशी चर्चा सुरू आहे.