National Herald Case: सोनिया गांधींना ईडीने पुन्हा बजावलं समन्स, ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. या प्रकरणी आता ईडीने २१ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. याआधीही सोनिया गांधी यांना याच प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं मात्र त्यावेळी त्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांनी हजर राहण्यासाठी मुदत मागितली होती. […]
ADVERTISEMENT

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. या प्रकरणी आता ईडीने २१ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. याआधीही सोनिया गांधी यांना याच प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं मात्र त्यावेळी त्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांनी हजर राहण्यासाठी मुदत मागितली होती.
नॅशनल हेराल्ड प्रकरण : नेहरूंच्या वर्तमानपत्रामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी कसे अडकले?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीने याच नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५० तास चौकशी केली होती. असोसिएट जर्नल लिमिटेड अर्थात AJL चा ताबा घेण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि त्यासाठी शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीसाठी कर्ज घेण्यात आलं हा मुख्य आरोप आहे.
काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला ९० कोटींचं कथित कर्ज दिलं असाही आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिलं. त्याच आधारे असोसिएट जर्नल लिमिटेडचे बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे आले होते. ९० कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला फक्त ५० लाख रूपये दिले असाही ठपका आहे. या प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे.