शिखर Bank प्रकरणात ED च्या महाराष्ट्रात धाडी, निशाण्यावर नेमकं कोण?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ED च्या नव्या धाडी पडत आहेत हे आपण गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. मुंबईतकला जी माहिती मिळाली आहे ती शिखर बँक प्रकरणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ED च्या कारवाया बघतो आहोत. सर्वात आधी जरंडेश्वर या सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणण्यात आली. या कारखान्याचा संबंध अजित पवारांच्या पत्नीशी आहे असं सांगण्यात आलं होतं. दुसरी कारवाई झाली ती नंदुरबारमधला साखर कारखाना, अमरावतीमधला अंबादेवी साखर कारखान्यावर ईडीने धाड टाकली होती.

ADVERTISEMENT

आता जी माहिती आपल्याकडे आली आहे त्यानुसार महाराष्ट्रात पाच ते सहा ठिकाणी ईडीचं धाडसत्र सुरू आहे. ईडीने आज जे धाडसत्र केलं आहे ते महत्त्वाचं आहे. ईडीच्या पाच ते सहा टीम मुंबईतून निघाल्या. मुंबईतल्या काही ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रात इतर काही ठिकाणीही धाडी मारण्यात आल्या आहेत. साखऱ कारखान्यांचा लिलाव कसा झाला? त्यासाठी कागदपत्रं काय दाखवण्यात आली होती? या सगळ्याचा तपास केला जातो आहे. शिखर बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. या सगळ्या धाडींमध्ये काय सापडलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत आणि मुंबईसह काही ठिकाणी धाडी मारण्यात आल्या आहेत.

काय आहे शिखर बँक घोटाळा?

हे वाचलं का?

2011 मध्ये हे प्रकरण सर्वात आधी समोर आलं होतं. त्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. नाबार्डने एक अहवाल दिला होता ज्यामध्ये 144 कोटींच्या कर्जांबाबत नकारात्मक शेरे देण्यात आले होते. ही कर्जं विविध साखर कारखाने, काही सूत गिरण्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये सुमारे 70 राजकारणी त्या काळी करण्यात आली होती.

2019 च्या निवडणुका जेव्हा झाल्या होत्या त्याधी काही नावं समोर आली होती. ज्यामध्ये अजित पवार, शरद पवार यांची नावं आली होती. शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर मी स्वतः ईडीसमोर जाईन अशी भूमिका शरद पवारांनी घेतली ज्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचं शक्तीप्रदर्शन पाहण्यास मिळालं होतं. मात्र ईडीने त्यांना तुम्ही येऊ नका असं सांगितलं होतं. विशेष बाब म्हणजे त्यानंतर शरद पवार यांचं नाव या प्रकरणात समोर आलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT