अनिल देशमुखांच्या नागपूरमधील शिक्षण संस्थेच्या व्यवहारावर ईडी ची का आहे नजर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. काही दिवसांपुर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या राहत्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत ईडीला महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अनिल देशमुख संचालक असलेल्या श्री साई शिक्षण संस्थेला सव्वा चार कोटी रुपये मिळाल्याचा पुरावा ईडीला मिळाला आहे.

ईडीच्या समन्सला अनिल देशमुखांचं उत्तर, म्हणाले कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही!

हे वाचलं का?

दिल्लीतील चार विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून अनिल देशमुख संचालक असलेल्या संस्थेला सव्वाचार कोटी रुपये प्राप्त झाल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. हाच धागा पुढे पकडून ईडी कारवाई करत आहे. अनिल देशमुखांचं कुटुंब या शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांनी हे पैसे हवाला मार्फत मुंबई वरून दिल्ली पाठवले आणि तेथून हे पैसे अनिल देशमुख संचालक असलेल्या श्री साई शिक्षण संस्था या ट्रस्ट च्या खात्यात टाकण्यात आले.

ADVERTISEMENT

नागपूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर फेटरी परिसरात देशमुख कुटुंब संचालक असलेल्या श्री साई शिक्षण संस्थेद्वारा संचालित एनआयटी ग्रुपचे इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि एमबीए कॉलेज आहे. तसेच संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे नागपुरातील रामदासपेठ परिसरातील मिडास हाईट्स येथे आहे. ‘मुंबई तक’ ने जेव्हा या कार्यालयात माहिती घेतली तेव्हा तेथे कोणी हजार नव्हते तसेच कोरोनामुळे महाविद्यालय सुद्धा सध्या बंद आहे.

ADVERTISEMENT

श्री साई शिक्षण संस्थेमध्ये देशमुख परिवारातील कोणाकोणाचा समावेश आहे ते बघूया

1) अनिल देशमुख- संचालक

2) आरती देशमुख – पत्नी – उप संचालक

2) सलील देशमुख- मोठा मुलगा, सचिव

3) रिद्धी सलील देशमुख- सून-सदस्य

4) ऋषिकेश देशमुख- लहान मुलगा

5) डॉ राजेश वायगावकर- सीईओ

6) कुंदन शिंदे – पी.ए.

7) डॉ. पुजा देशमुख – परिवारातील सदस्य

गेल्याच आठवड्यात अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील ठिकाणांवर ईडी नी छापे मारले होते, त्यावेळी नागपुरातील धाडीमध्ये अनिल देशमुख जरी उपस्थित नव्हते तरी त्यांचे कुटुंब नागपुरात उपस्थित होते. श्री साई शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत ईडी ने देशमुख यांच्या मुलाची, सुनेची चौकशी केली असल्याची माहिती पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणी श्री साई शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी सोबत मुंबई तक ने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी काळात अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT