पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला, आठ कामगार जखमी
पुण्यातील बालेवाडी भागात असलेल्या पाटील नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून 6 ते 8 जण जखमी झाले आहे. बांधकाम सुरू असताना या इमारतीचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेत अशी भीती व्यक्त होत होती. मात्र तसं घडलेलं नाही. आता या घटनेत एकूण आठ कामगार जखमी झाले आहेत असं कळतं आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच […]
ADVERTISEMENT

पुण्यातील बालेवाडी भागात असलेल्या पाटील नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून 6 ते 8 जण जखमी झाले आहे. बांधकाम सुरू असताना या इमारतीचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेत अशी भीती व्यक्त होत होती. मात्र तसं घडलेलं नाही. आता या घटनेत एकूण आठ कामगार जखमी झाले आहेत असं कळतं आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दल पोहचण्यापूर्वी या सगळ्यांना रूग्णालयात नेण्यात आलं आहे. पाटील नगर येथे इमारतीचं बांधकाम सुरू असताना 10 फूट उंचीचा स्लॅब कोसळून हा अपघात झाला. जे जखमी झाले त्या सगळ्यांना लाईफलाईन हॉस्पिटल वाकड या ठिकाणी नेण्यात आलं आहे.