“एकनाथ शिंदेंनाही भाजपतच विलीन व्हावं लागेल”; भाजप नेत्याच्या हवाल्यानं ‘रोखठोक’मध्ये गौप्यस्फोट
शिंदे गटातील २२ आमदार नाराज आहेत आणि त्यातील बहुतांश आमदार भाजपत विलीन होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख करत सामनातल्या रोखठोक सदरात भाजप नेत्याच्या हवाल्यानं मोठं विधान करण्यात आलंय. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, असाही उल्लेख या सदरात करण्यात आलाय. रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या सामनातल्या रोखठोक सदरातून शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीये. रोखठोकमध्ये म्हटलंय की, […]
ADVERTISEMENT

शिंदे गटातील २२ आमदार नाराज आहेत आणि त्यातील बहुतांश आमदार भाजपत विलीन होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख करत सामनातल्या रोखठोक सदरात भाजप नेत्याच्या हवाल्यानं मोठं विधान करण्यात आलंय. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, असाही उल्लेख या सदरात करण्यात आलाय.
रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या सामनातल्या रोखठोक सदरातून शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीये. रोखठोकमध्ये म्हटलंय की, “मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले.”
शिंदे गटातील २२ आमदार नाराज?
रोखठोकमध्ये पुढे म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’ हे विधान बोलके आहे.”
संजीव भोर पाटलांचा शिंदे गटात प्रवेश : राष्ट्रवादी लक्ष्य की विखे पाटलांना आव्हान?