Savarkar: उद्धव ठाकरे खिंडीत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेरलं, केला सवाल
Eknath Shinde asked uddhav Thackeray what will you do : राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे. शिंदेंनी ठाकरेंना सवाल केला आहे…
ADVERTISEMENT
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांबद्दल अपमानजनक बोलू नका असा इशारा दिला. मात्र, आता याच मुद्द्यावरून शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सवाल करत घेरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत घेत ठाकरेंचा नामोल्लेख टाळत टोले लगावले.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधींकडून होतोय. त्याचा खरा म्हणजे निषेध करावा तितका कमी. मी त्याचा जाहीर धिक्कार करतो. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आंदोलन करत असताना काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.”
हेही वाचा – ‘Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर…’ : बावनकुळेंनी ललकारलं
“देशभक्ताच्या, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेतोय. त्याचमुळे या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशाभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी जो त्याग केला, स्वातंत्र्य मिळवलं. त्यांचा जाणीवपूर्वक अवमान, अपमान करण्याचा निंदनीय प्रयत्न केला जातो. त्याचा निषेध देशभरातून होतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे वाचलं का?
सावरकर होण्याची लायकी नाही, राहुल गांधींवर शिंदेंची टीका
“राहुल गांधींनी एक दिवस स्वातंत्र्यावीर सावरकर ज्या सेल्युलर जेलमध्ये होते, तिथे एक दिवस राहून आले की, त्यांना जाणीव होईल. पण, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यांच्या कृत्याचा निषेध करावा तितका कमी आहे. त्याचा निषेध सगळ्यांनी करायला हवा होता. ते वारंवार सांगताहेत की ते सावरकर नाही, गांधी आहेत. सावरकर होण्याची लायकी नाही. सावरकरांसारखा त्याग तुमच्यात नाही. सावरकर व्हायला, या देशाबद्दल प्रेम असायला पाहिजे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.
हेही वाचा – “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर ठाकरेंची घणाघाती टीका
“तुम्ही या देशाची निंदा परदेशात जाऊन करत आहात. पंतप्रधान मोदींबद्दल बोलत आहात. देशात एकमेकांवर आरोप करणे समजू शकतो. पण, परदेशातून जाऊन करणे निंदनीय आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी एकही शब्द काढला नाही; शिंदेंनी ठाकरे गटावर चढवला हल्ला
“सावरकरांनी अनेक क्षेत्रात काम केले आहे. ते संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यांचा अपमान वारंवार होतोय. हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात एकही शब्द काढला नाही. उलट राहुल गांधींची खासदारकी नियमानुसार गेली, त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून काँग्रेसच्या बरोबरीने साथ देणारे नेते आपण पाहिले”, असं म्हणत शिंदेंनी ठाकरे गटावर टीका केली.
ADVERTISEMENT
“सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असं बोलणारे नेते, त्यांचे आमदार विधानसभेत मूग गिळून गप्प होते. कशासाठी, राजकारणासाठी, महाविकास आघाडीसाठी, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. कालच्या रॅलीत म्हणाले सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. म्हणजे मग काय करणार आहेत?”, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.
हेही वाचा – राहुल गांधींच्या वक्तव्याचं नाना पटोलेंकडून समर्थन, उद्धव ठाकरेंची अडचण वाढणार?
“बाळासाहेबांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मनिष शंकर अय्यरांच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार आहात का? माध्यमांनीही त्यांना विचारलं पाहिजे की, अपमान सहन करणार नाही, म्हणजे काय करणार?”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींमुळे कोंडी वाढणार का? #uddhavthackeray #shivsena #savarkar #rahulgandhi@madhavidesai10 @AnujaDhakras21 https://t.co/wD1mn2Nrmj
— Mumbai Tak (@mumbaitak) March 27, 2023
“सगळ्या बाजूने भडीमार झाल्यानंतर उशिरा सूचलेले शहाणपण ज्याला म्हणतात, त्याप्रमाणे बोलले. बोलून काय होणार आहे, त्यांच्या कृतीतून दिसले पाहिजे. त्यांचे चिरंजीव म्हणाले की, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणजे तुम्ही हे ठरवल्यासारखं करता आहात. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT