Eknath Shinde यांचा मोर्चा काँग्रेसकडे? एकमेव खासदाराचा मोठा गौप्यस्फोट
Congress MP Balu Dhanorkar : चंद्रपूर : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्वांचा डीएनए शिवसेनाच (Shivsena) आहे, त्यांच्या रक्तात शिवसेना आहे. जुन्या शिवसेनेचा आणि नव्या शिवसेनेचा डीएनए एकच आहे, महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि खासदारांची शिवसेना आहे. आम्ही काहींनी पक्ष बदलला पण विचारधारा बदलली नाही, असं म्हणतं काँग्रेसचे (Congress) एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी आपल्या मनात […]
ADVERTISEMENT
Congress MP Balu Dhanorkar :
ADVERTISEMENT
चंद्रपूर : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्वांचा डीएनए शिवसेनाच (Shivsena) आहे, त्यांच्या रक्तात शिवसेना आहे. जुन्या शिवसेनेचा आणि नव्या शिवसेनेचा डीएनए एकच आहे, महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि खासदारांची शिवसेना आहे. आम्ही काहींनी पक्ष बदलला पण विचारधारा बदलली नाही, असं म्हणतं काँग्रेसचे (Congress) एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी आपल्या मनात अद्यापही शिवसेना असल्याचं जाहीरपणे मान्य केलं. यावेळी त्यांनी शिंदेंकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर असल्याचाही गौप्यस्फोट केला. (Congress MP Balu Dhanorkar invited by Eknath Shinde to join Shiv Sena)
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर बोलत होते.
हे वाचलं का?
Fadnavis घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स, हे कुठलं हिंदूत्व?: रुपाली ठोंबरे
महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार एकत्र केले तर सर्वांचा डीएनए शिवसेना आहे, मग तो शिवसेनेचा असो, इतर शिवसेनेचा. तो राष्ट्रवादीत गेलेला असो वा काँग्रेसमध्ये गेलेला किंवा अपक्ष. या सर्वांच्या रक्तात शिवसेना आहे. पक्ष बदलला पण विचार बदलला नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन, विविध पक्षात काम करून आजही समाजाचे ऋण फेडण्याचे काम करत आहोत.
ADVERTISEMENT
Aurangabad: ‘आम्ही अर्धवट काहीच ठेवत नाही’, देवेंद्र फडणवीसांना मारला टोमणा
ADVERTISEMENT
आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मित्राप्रमाणे आणि भावासारखे आहेत. शिंदेसाहेब आणि मी एकत्र आमदार होतो, आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी मला “इकडे या-इकडे या” असे निमंत्रणही दिले होते. पण ठाकरे कुटुंबीय, शिंदे कुटुंबीय, पवार कुटुंबीय, काँग्रेस कुटुंबीय आणि अपक्ष हे सगळे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळेच पक्षाचा विषय मी कधीच मनात ठेवला नाही. नेहमी कष्टकरी जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही धानोरकर म्हणाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असं वातावरण भाजप-शिवसेना युतीने तयार केलं होतं. अशात धानोरकरांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करत धक्कादायकरित्या विजयही मिळविला. चंद्रपूर मतदारसंघातून त्यांनी थेट केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत धानोरकरांच्या रुपाने महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. मात्र आता आपल्या मनात अजूनही शिवसेना जिवंत असून शिंदेंकडून ऑफरही असल्याचं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT