शिंदे गट शिवसेना भवनासाठी उद्धव ठाकरेंना भिडणार?; गिरीश महाजनांनी काय विधान केलं?
एकनाथ शिंदे शिवसेनेविरोधात बंड केलं. बंडानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १४ खासदार स्वतःच्या गटात ओढले आणि स्वतः शिवसेनेचे मुख्यनेता झाले. त्यानंतर शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला. हा वाद प्रलंबित असतानाच आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ शकतात. ही चर्चा सुरू झालीये ती भाजपच्या नेत्याच्या विधानामुळे. गिरीश महाजनांचं विधान त्यामुळेच चर्चेत आलंय. शिवसेनेविरोधात बंडखोरी […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे शिवसेनेविरोधात बंड केलं. बंडानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह १४ खासदार स्वतःच्या गटात ओढले आणि स्वतः शिवसेनेचे मुख्यनेता झाले. त्यानंतर शिंदेंनी पक्षावर दावा ठोकला. हा वाद प्रलंबित असतानाच आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होऊ शकतात. ही चर्चा सुरू झालीये ती भाजपच्या नेत्याच्या विधानामुळे. गिरीश महाजनांचं विधान त्यामुळेच चर्चेत आलंय.
शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिंदे आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. परतल्यानंतर शिंदेंनी शिवसेनेच्या काही खासदारांनी आपल्या गटात घेतलं. आमदार आणि खासदारांच्या पाठिंब्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांना (उद्धव ठाकरे) बाजूला सारून शिंदेंनी शिवसेनेच्या कार्यकारिणीत बदल केले. स्वतः मुख्यनेता झाले आणि सर्व अधिकार स्वतःकडे घेतले.
शिवसेना मुख्यनेता झालेल्या शिंदेंनी शिवसेना ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला कार्यकारिणी बदलासंदर्भात पत्र दिलं. एकनाथ शिंदेंकडून झालेल्या या हालचालीनंतर शिवसेना भवनावर शिंदे गट ताबा सांगेल अशीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदे गट प्रति शिवसेना भवन उभारणार, असंही म्हटलं गेलं. मात्र, या चर्चेची धूळ हळूहळू खाली बसली.
त्यानंतर आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाने या चर्चेला पुन्हा तोंड फुटलंय. शिवसेना भवनावर शिंदे गट ताबा सांगू शकतो, ही चर्चा का सुरू झाली. हे समजून घेण्यासाठी गिरीश महाजन यांचं वक्तव्य बघणं महत्त्वाचं आहे.










