Shivde vs Thackeray : मैदान, मेळावे, उत्सवांनंतर शिंदे-ठाकरे गट शाखांवरुन भिडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : आधी मैदान मग दसरा मेळावा मग दुर्गादेवीचे उत्सव. अशा सगळ्या गोष्टीनंतर आता शिवसेनेतील दोन गट शाखांवरुन एकमेकांना भिडले आहेत. आज एका दिवसात डोंबिवली आणि नवी मुंबईतील तुर्भे येथील शाखांवरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आलेले पहायला मिळाले. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेरीस या दोन्ही शाखा शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.

ADVERTISEMENT

डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलं?

सुमारे दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील शिवसेना शाखेबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा वाद झाला होता. त्यानंतर या शाखेचे दोन भागात विभाजन करण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा या मुद्द्यावर दोन्ही आमने-सामने आले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शाखेबाहेर थांबविले. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण झालं होतं. याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शाखेभोवती पोलीस बंदोबस्त तैनात केला.

यावेळी शिंदे गटाने ही शाखा आमची असल्याचा दावा केला. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे म्हणाले, या शाखेच्या विक्रीचा ठेका देण्याचे काम कोरोना आणि लॉकडाऊनपूर्वी सुरू करण्यात आले होते, आता हे काम पूर्णत्वास आले असून अखेर शिंदे गटाने ही शाखा ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटाचे महेश पाटील, रवी पाटील, दिपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, जनार्दन म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी येऊन शाखा ताब्यात घेतली.

हे वाचलं का?

या दरम्यान, वर्धमान एंटरप्रायझेस आणि शिंदे गटाचे पदाधिकारी जितेन पाटील यांच्यात १४ ऑक्टोबर रोजीच ही नोंदणी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटातील महिला पदाधिकारी शिल्पा मोरे यांनी शाखेत पोलिसांसमोर जोरजोरात आरडाओरडा केला. शिंदे गटाने शाखेवर दावा केला असला तरी ठाकरे गटाने तो दावा मान्य केलेला नाही, असे त्यांनी सांगितले. पण शिवसेनेची फूट तीन महिन्यांपूर्वी झाली, मग कोरोनाच्या काळातच शाखा काबीज करण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

नवी मुंबईमध्ये काय झाले?

डोंबिवीलनंतर नवी मुंबईतील तुर्भेमधील शाखेवरुनही शिंदे-ठाकरे गटात चांगलीच जुंपली होती. अखेरीस पोलिसांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला. ही शाखा शिंदे गटाचे समर्थक राजू शेख यांच्या नावावर असल्याचं कारण देत पोलिसांनी हा वाद शमवला. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते शाखा ताब्यात घेण्यासाठी गेले असता कागदपत्र पाहून माघारी फिरले. त्यानंतर आता इथला जुना बोर्ड हटविण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

नरेश मस्के काय म्हणाले?

या वादाबाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, जे आमच्या ताब्यात आहे ते पुन्हा ताब्यात घेण्याची गरज नाही. शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा हा विषय नाही, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू होतं. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, शहर प्रमुख राजेश मोरे या शाखेत बसूनच शिवसेनेचे काम पाहत होते. त्यामुळे ताब्यात घेण्याचा विषय नाही.गेल्या तीन महिन्यापासून आमचे लोक या शाखेत बसून काम पाहतात. जी गोष्ट ताब्यात नसते ती ताब्यात घेतली जाते. ही गोष्ट आमचीच आहे, जिल्हाप्रमुख. शहरप्रमुख हे सगळे आमचे आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT