शिवसेना सत्तेत असतानाचं मोठं बंड एकनाथ शिंदेंचं..आत्तापर्यंत किती दिग्गजांचा सेनेला जय महाराष्ट्र?
शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिलं जातं आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं असून ते २६ ते २७ आमदारांसह सुरतमध्ये आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे आणि त्यांनी २६ पेक्षा जास्त आमदारांना […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे पाहिलं जातं आहे. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीनंतर नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं असून ते २६ ते २७ आमदारांसह सुरतमध्ये आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे हे पहिले नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे आणि त्यांनी २६ पेक्षा जास्त आमदारांना आपल्याला सोबत नेलं आहे.
शिवसेनेचे मंत्री तसंच महत्त्वाचे नेते मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे तो शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. असं असलं तरीही शिवसेनेत बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक दिग्गजांनी शिवसेना सोडली आहे. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आमदारही फोडले होते.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना का म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’
छगन भुजबळ हे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले पहिले नेते आहेत. १९९१ मध्ये आठ आमदारांना सोबत घेत छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले होते.
