एकनाथ शिंदेंची प्रतिशिवसेना, जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत उचललं महत्त्वाचं पाऊल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदाला त्यांनी हात लावलेला नाही. मात्र शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचीच निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, विजय नहाटा आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे असं काहीतरी पाऊल उचलणार हे स्पष्टच झालं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिशिवसेनाच स्थापन केली आहे. २१ जून रोजी त्यांनी जे बंड पुकारलं होतं त्यानंतर घडलेल्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच. अशातच रामदास कदम यांनी आज नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता तेही शिंदे गटात आले आहेत.
शिवसेनेच्या खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता
शिवसेना राष्ट्रीय पातळीवर फुटणार हेदेखील जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ट्रायडंट हॉटेलमधल्या बैठकीत ऑनलाइन उपस्थिती लावली होती. लोकसभेत शिवसेनेचे नेते म्हणून राहुल शेवाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रतोदपदी भावना गवळी कायम असतील असंही कळतं आहे.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे यांच्या गटाने २१ जूनला बंड केल्यापासूनच आम्हीच खरी शिवसेना आहोत हे जाहीर केलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे विविध ठिकाणी पदांवर असलेल्या लोकांची हकालपट्टी करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी हे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत शिवसेनेच्या १३ खासदारांची उपस्थिती होती. हे सगळे खासदार ऑनलाइन या बैठकीत उपस्थित होते ही माहिती समजली आहे. तसंच आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून करणार कार्यकारिणीची घोषणा करणार आहेत. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आधीच गेले आहेत. अशात आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १४ जण या बैठकीत होते त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटात हे खासदारही येणार हे जवळपास नक्की झालंय. पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा एकनाथ शिंदे करणार यावरूनच हे बोललं जातं आहे की एकनाथ शिंदे आता पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT