वीज कर्मचारी संपाचा नाशिकमधल्या १२ कुटुंबांना फटका, 72 तास लोटूनही आहेत अंधारात
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक एक दिवस वीज देयक थकली तरी त्वरित वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरण कंपनीने मात्र नियमित वीज बिल भरणाऱ्या 18 कुटुंबाना वाऱ्यावर सोडले आहे. शुक्रवारी मध्यरात्री नाशिक शहरातील नवीन नाशिक मधील साई पूजा रो हाऊस ही 12 रो हाऊसची वसाहत आहे, 12 रो हाऊस मध्ये वर खाली असे 18 कुटुंब राहतात. शुक्रवारी […]
ADVERTISEMENT

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
एक दिवस वीज देयक थकली तरी त्वरित वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरण कंपनीने मात्र नियमित वीज बिल भरणाऱ्या 18 कुटुंबाना वाऱ्यावर सोडले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री नाशिक शहरातील नवीन नाशिक मधील साई पूजा रो हाऊस ही 12 रो हाऊसची वसाहत आहे, 12 रो हाऊस मध्ये वर खाली असे 18 कुटुंब राहतात. शुक्रवारी मध्यरात्री केबल जळाल्याने ह्या बारा रो हाऊसचा वीजपुरवठा बंद झाला, शुक्रवारी तक्रार केल्यावर शनिवारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शनिवारी दुपारी येऊन गेले पण केबल उपलब्ध नसल्याने जण देत रविवारीही वीज पुरवठा पूर्वरत झाला नाही, सोमवारी मात्र संपाचे कारण देण्यात आले. त्यामुळे नागरिक संतप्त आहे.