Twitter Logo : ट्विटरची निळी चिमणी गायब, एलन मस्कने मीम डॉगीलाच बनवलं लोगो
Twitter Logo Changed : एलन मस्कने ट्विटरच्या लोगोमध्येच मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणी दिसण्याऐवजी डॉग दिसणार आहे. या बदलानंतर सोशल मीडिया मीम्सचा पाऊस पडतोय.
ADVERTISEMENT
Twitter Logo Changed : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk) ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी केल्यापासून त्यामध्ये नवनवीन बदल केले आहेत. ट्विटर खरेदी केल्यापासून एलन मस्कने ब्लु टीकच्या (Twitter Blue Tick) नियमात बदल केले होते. या बदलानंतर आता एलन मस्कने ट्विटरच्या लोगोमध्येच मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणी दिसण्याऐवजी डॉग दिसणार आहे. या बदलानंतर सोशल मीडिया मीम्सचा पाऊस पडतोय.(elon musk changed twitter logo from blue bird to doge)
ADVERTISEMENT
#Doge ट्रेंड
नेटकऱ्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोमवार रात्रीपासून चिमणीच्या जागी डॉगचा (Dog) लोगो दिसत होता. हा लोगो पाहून नेटकरी हैराण झाले होते. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर #Doge ट्रेंड सुरू केला होता.या ट्रेंडखाली ट्विटरच्या नवीन लोगोबाबत नेटकऱ्यांनी तुफान चर्चा करत मीम्स शेअर केले होते. अनेक नेटकऱ्यांना ट्विटर हॅक झाल्याचे वाटत होते. मात्र नंतर एलन मस्कने (Elon Musk) ट्विट करत लोगो बदलल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्विटर हॅकच्या चर्चांना ब्रेक मिळाला होता.
हे ही वाचा : Video: दिल्लीच्या मेट्रोत शिरली बिकनी गर्ल, अन् प्रवाशांची उडाली तारांबळ
एलन मस्कच्या ट्विटमध्ये काय?
एलन मस्कने (Elon Musk) मंगळवारी रात्री 12.20 च्या दरम्यान एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये डॉगी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. यावेळी वाहतूक पोलिस त्याला लायसन्स विचारत आहे. या लायसन्समध्ये नीळी चिमणी म्हणजेच ट्विटरचा जुना लोगो दिसत आहे. ज्यानंतर डॉग त्याला म्हणतो, ‘हा जुना फोटो आहे. एलन मस्कच्या या ट्विटनंतर त्याने लोगो बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता ट्विटरवर चिमणीच्या जागी डॉग दिसणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान या ट्विटच्या एका तासानंतर एलन मस्कने आणखीण एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये प्रॉमिस लिहले आहे, म्हणजेच आश्वासन. युझर्सला दिलेले आश्वासन पुर्ण झाल्याचा अर्थ असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
ADVERTISEMENT
एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरचा लोगो बदलण्याचे याआधी देखील संकेत दिले होते. फेब्रुवारी दरम्यान एलन मस्कने एक फोटो ट्विट केला होता. या फोटोत ट्विटरचे ऑफीस दाखवण्यात आले होते, आणि या ऑफीसच्या म्हणजेच सीईओच्या चेअरवर कुत्रा बसलेला आहे. तसेच या कुत्र्यासमोर असलेल्या टेबलवर एक पेपर ठेवला होता. यावर कुत्र्याचे नाव फ्लोकी लिहले गेले आहे आणि त्याखाली चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफिसर लिहले आहे. विशेष म्हणजे या पेपरवर ट्विटरचा जुना लोगो होता.त्यावेळी कोणाला वाटलं देखील नसेल की मस्क ट्विटरच अनेक वर्षापूर्वीचा जूना लोगो बदलेल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दोन तरुणींसोबत जीवघेणे स्टंट, मुंबई पोलिसांनी ‘त्या’ तरुणाला केली अटक
ट्विटरची कितीला खरेदी?
एलन मस्कने (Elon Musk) गेल्याच वर्षी माइक्रोब्लॉगिंग साईट ट्विटवर खरेदी केली होती. 44 अरब डॉलरमध्ये ट्विटरची ही डिल झाली होती. मस्क यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 54.2 डॉलर प्रति शेअरच्या रेटनुसार 44 अरब डॉलरला खरेदीची ऑफर मिळाली होती. परंतू स्पॅम आणि फेक अकाऊंटमुळे त्यांनी ही डिल होल्डवर ठेवली होती.मस्क या डिलमधून माघार घेणार होते, मात्र प्रकरण कोर्टात पोहोचल्याने त्यांना ही डिल पुर्ण करावी लागली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT